अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
कलम ३९ :
विवक्षित प्रकरणांमध्ये अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याचे दायित्व :
या अधिनियमा अन्वये किंवा त्याखाली केलेल्या नियम आणि विनियमांच्या अधीन अधिकारांचा वापर करणारा कोणताही अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकारी जो,-
(a) क) त्रास देण्याच्या उद्देशाने आणि कोणतेही वाजवी कारण नसताना, कोणतेही अन्न (खाद्य) पदार्थ किंवा भेसळ करण्याचा पदार्थ जप्त करील; किंवा
(b) ख) कर्तव्य पार पाडण्यासाठी असे कृत्य आवश्यक आहे असा विश्वास न ठेवता कोणत्याही व्यक्तीला दुखापत पोहचविणारे कोणतेही कृत्य करील,
या अधिनियमा अन्वये अपराधासाठी दोषी ठरेल व एक लाख रुपयांपर्यंतच्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल :
परंतु असे की, जर अशा अन्न (खाद्य) सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध खाटी तक्रार (फिर्याद) केली असेल व तसे सिद्ध झाल्यास, तक्रारदार (फिर्यादी) या अधिनियमा अन्वये दोषी ठरेल व पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी नसेल परंतु एक लाख रुपयापर्यंत वाढविता येईल इतक्या द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल.