अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६
(२००६ चा अधिनियम क्रमांक ३४)
अन्नाशी संबंधित कायदे एकत्रित करणे आणि खाद्यपदार्थांसाठी विज्ञान शास्त्रावर आधारित अन्नाची मानके तयार करण्यासाठी मानक प्राधिकरणाची स्थापना करणे आणि त्याचे उत्पादन, साठवण, वितरण, विक्री आणि आयात यांचे नियमन करणे जेणेकरुन मानवी वापरासाठी सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाची उपलब्धता सुनिश्चित करणे यासाठी आणि यासंबंधित व अनुषंगिक बाबींसाठी उपबंध करण्याकरिता अधिनियम.
भारतीय गणराज्याच्या सत्तावन्नाव्या वर्षी संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
प्रकरण १ :
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ :
१) या अधिनयिमास अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ असे म्हणावे.
२) याचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे.
३) केंद्र सरकार, अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नियुक्त करेल अशा तारखेपासून हा अंमलात येईल आणि या अधिनियमाच्या वेगवेगळ्या तरतुदींसाठी वेगवेगळ्या तारखा नियुक्त केल्या जाऊ शकतील आणि या अधिनियमाच्या प्रारंभासाठीच्या अशा कोणत्याही तरतुदीतील कोणताही संदर्भ त्या तरतुदीच्या अंमलात येण्याचा संदर्भ म्हणून समजला जाईल.