Cotpa कलम ५ : सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातीवर प्रतिबंध :

सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३
कलम ५ :
सिगारेटच्या किंवा इतर तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातीवर प्रतिबंध :
(१) सिगारेटच्या किंवा इतर कोणत्याही तंबाखू उत्पादनांच्या उत्पादन प्रक्रियेत, पुरवठ्यात किंवा वितरणात गुंतलेल्या किंवा गुंतला असल्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला, सिगारेट किंवा इतर तंबाखू उत्पादनांची जाहिरात करता येणार नाही आणि एखाद्या माध्यमावर नियंत्रण असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्या माध्यमांमार्फत जाहिरात करावयाची व्यवस्था करता येणार नाही आणि कोणतीही व्यक्ती, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सिगारेटचा किंवा इतर तंबाखू उत्पादनांचा वापर किंवा खप सूचित करणार नाही किंवा त्यास, चालना देणार नाही.
(२) कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आर्थिक लाभासाठी, –
(a)(क) सिगारेट किंवा इतर कोणत्याही तंबाखू उत्पादनाची कोणतीही जाहिरात प्रदर्शित करणार नाही, प्रदर्शित करण्याची व्यवस्था करणार नाही किंवा प्रदर्शित करण्याची परवानगी देणार नाही किंवा त्यासंबंधात प्राधिकार देणार नाही; किंवा
(b)(ख) सिगारेट किंवा इतर कोणत्याही तंबाखू उत्पादनाच्या जाहिरातींचा अंतर्भाव असलेली एखादी फिल्म किंवा व्हिडिओ टेप (दृकश्राव्य फीत) याची विक्री करणार नाही किंवा विक्रीची व्यवस्था करणार नाही किंवा विक्रीची परवानगी देणार नाही किंवा त्याबाबत प्राधिकार देणार नाही; किंवा
(c)(ग) सिगारेट किंवा इतर कोणत्याही तंबाखू उत्पादनाची जाहिरात असलेल्या किंवा ज्यात जाहिरातीचा अंतर्भाव आहे अशा कोणत्याही पर्णकाचे, हस्तपत्रकाचे किंवा कागदपत्राचे वितरण करणार नाही किंवा वितरण करण्याची व्यवस्था करणार नाही किंवा वितरण करण्याची परवानगी देणार नाही किंवा त्याबाबत प्राधिकार देणार नाही; किंवा
(d)(घ) सिगारेट किंवा इतर कोणत्याही तंबाखू उत्पादनाची कोणतीही जाहिरात, कोणतीही जमीन, इमारत, qभत, जाहिरात फलक, चौकट, स्तंभ किंवा संरचना यांवर किंवा कोणत्याही वाहनावर किंवा वाहनात उभारणार नाही, त्यांचे प्रदर्शन करणार नाही, लावणार नाही किंवा ठेवू देणार नाही किंवा कोणत्याही जागेत कोणत्याही रीतीने ती प्रदर्शित करणार नाही :
परंतु, हे पोट कलम पुढील संबंधात लागू होणार नाही –
(a)(क) सिगारेट किंवा इतर कोणत्याही तंबाखू उत्पादन अंतर्भूत असणाऱ्या पुडक्यांच्या आतील बाजूस किंवा त्यांवर असलेली सिगारेटी किंवा इतर कोणत्याही तंबाखू उत्पादनाची जाहिरात;
(b)(ख) जेथे सिगारेट किंवा कोणतेही इतर तंबाखू उत्पादन वितरणासाठी किंवा विक्रीसाठी देऊ केले जाते अशा वखारीच्या किंवा दुकानाच्या प्रवेशाच्या ठिकाणी किंवा आतील बाजूस प्रदर्शित केली असेल अशी सिगारेट किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनाची जाहिरात.
(३) कोणतीही व्यक्ती, –
(a)(क) सिगारेट किंवा कोणतीही इतर तंबाखू उत्पादन; किंवा
(b)(ख) कोणत्याही अन्य व्यक्तीकडून पुरस्कृत केलेल्या किंवा शिष्यवृत्ती यांच्या बदल्यात दिलेली किंवा द्यावयाचे मान्य केलेली देणगी, बक्षीस किंवा शिष्यवृत्ती यांच्या बदल्यात सिगारेट किंवा कोणत्याही इतर तंबाखू उत्पादनांचे कोणतेही व्यापारी चिन्ह किंवा ब्रॅन्ड नाव,यांचा वापर किंवा खप यास कराराद्वारे वा अन्यथा चालना देणार नाही किंवा चालना देण्याचे मान्य करणार नाही.

Leave a Reply