भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-ठ :
संघ राज्यक्षेत्रांना लागू असणे :
या भागाच्या तरतुदी, संघ राज्यक्षेत्रांना लागू होतील आणि, एखाद्या संघ राज्यक्षेत्राला त्या लागू करताना, राज्याच्या राज्यपालांचे निर्देश हे, जणू काही अनुच्छेद २३९ अन्वये नियुक्त करण्यात आलेल्या संघ राज्यक्षेत्राच्या प्रशासकाचे निर्देश असल्याप्रमाणे आणि राज्याच्या विधानमंडळाचे किंवा विधानसभेचे निर्देश हे, जणू काही विधानसभा असलेल्या संघ राज्यक्षेत्राच्या संबंधातील त्या विधानसभेचे निर्देश असल्याप्रमाणे, त्या तरतुदी प्रभावी होतील :
परंतु असे की, राष्ट्रपती, जाहीर अधिसूचनेद्वारे, असा निदेश देऊ शकेल की, या भागाच्या तरतुदी, त्या अधिसूचनेत तो विनिर्दिष्ट करील अशा अपवादांना आणि फेरबदलांना अधीन राहून कोणत्याही संघ राज्यक्षेत्राला किंवा त्याच्या भागाला लागू होतील.