भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३-ख :
पंचायती घटित करणे :
(१) या भागाच्या तरतुदींनुसार प्रत्येक राज्यामध्ये ग्रामपातळीवर, मधल्या पातळीवर व जिल्हा पातळीवर पंचायती घटित करण्यात येतील.
(२) खंड (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, वीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या नसेल अशा एखाद्या राज्यात मधल्या पातळीवरील पंचायती घटित करण्यात येणार नाहीत.