भारताचे संविधान ( राज्यघटना )
परिशिष्ट १ :
संविधान (शंभरावी सुधारणा) अधिनियम २०१५ :
(२८ मे २०१५)
भारत व बांग्लादेश सरकार यांच्यामध्ये झालेला करार व त्याचा मूळ मसुदा यांनुसार, भारताकडून राज्यक्षेत्रांचे संपादन व बांग्लादेशास विवक्षित राज्यक्षेत्रांचे हस्तांतरण अंमलात आणण्यासाठी भारताच्या संविधानात आणखी सुधारणा करण्याकरिता अ्रधिनियम.
तो, भारतीय गणराज्याच्या सहासष्टाव्या वर्षी, संसदेकडून पुढीलप्रमाणे अधिनियमित होवो :-
१. संक्षिप्त नाव :
या अधिनियमास, संविधान (शंभरावी सुधारणा) अधिनियम २०१५ असे म्हणावे.
२.व्याख्या :
या अधिनियमातील, –
क) संपादित राज्यक्षेत्र याच्या अर्थ, भारत – बांग्लादेश करारामध्ये व त्याच्या मूळ मसुद्यामध्ये समाविष्ट असलेली आणि पहिल्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेली जितकी राज्यक्षेत्रे, खंड (ग) मध्ये निर्दिष्ट केलेला करार व त्याच्या मूळ मसुदा यांनुसार, भारताने बांग्लादेशाकडून संपादित करण्याच्या प्रयोजनार्थ सीमांकित केलेली आहेत तितकी राज्यक्षेत्रे, असा आहे;
ख) नियत दिवस याचा अर्थ, अशी तारीख की जी, केन्द्र सरकार, पहिल्या अनुसूचीमध्ये व दुसऱ्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे आणि त्याप्रयोजनार्थ सीमांकित केल्याप्रमाणे, अशाप्रकारे संपादित व हस्तांतरित करावयाच्या राज्यक्षेत्रांची व्यवस्था केल्यानंतर, भारत-बांग्लादेश करार व त्याचा मूळ मसूदा यांनुसार, बांग्लादेशाकडून राज्यक्षेत्रांचे संपादन करण्याची व बांग्लादेशाला राज्यक्षेत्रांचे हस्तांतरण करण्याची तारीख म्हणून राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील;
ग) भारत-बांग्लादेश करार याचा अर्थ, ज्यांचे संबंधित उतारे तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेले आहेत असा, भारत व बांग्लादेश यांच्यामधील भू-सीमांचे सीमांकन व संबंधित बाबी यांच्याशी संबंधित असणारा भारताचे गणराज्य सरकार व बांग्लादेश जनवादी गणराज्य सरकार यांच्यामधील दिनांक १६ में १९७४ चा करार, दिनांक २६ डिसेंबर १९७४, दिनांक ३० डिसेंबर १९७४, दिनांक ७ ऑक्टोबर १९८२, दिनांक २६ मार्च १९९२ चा पत्रव्यवहार आणि भारत व बांग्लादेश सरकार यांच्यामध्ये झालेल्या दिनांक ६ सप्टेंबर २०११ च्या उक्त कराराचा मूळ मसुदा, असा आहे;
घ) हस्तांतरित राज्यक्षेत्र याचा अर्थ, भारत-बांग्लादेश करारामध्ये व त्याच्या मूळ मसुद्यामध्ये समाविष्ट असलेली आणि दुसऱ्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेली जितकी राज्यक्षेत्रे, खंड (ग) मध्ये निर्दिष्ट केलेल्या करारांच्या व त्यांच्या मूळ मसुद्याच्या अनुसार, भारताकडून बांग्लादेशाला हस्तांतरित करण्याच्या प्रयोजनार्थ सीमांकित केलेली आहेत तितकी राज्यक्षेत्रे, असा आहे.
३. संविधानाच्या पहिल्या अनुसूचीची सुधारणा :
नियत दिवसापासूनच, संविधानातील पहिल्या अनुसूचीमधील, –
क) आसाम राज्याच्या राज्यक्षेत्रांशी संबंधित असणाऱ्या परिच्छेदामध्ये, (आणि संविधान (नववी सुधारणा) अधिनियम १९६० याच्या कलम ३ च्या खंड (क) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जेथवर त्याचा संविधान (शंभरावी सुधारणा) अधिनियम, २०१५ याच्या दुसऱ्या अनुसूचीच्या भाग एकमध्ये निर्दिष्ट केलेल्या राज्यक्षेत्रांशी संबंध आहे तेथवर संविधान (शंभरावी सुधारणा) अधिनियम याच्या दुसऱ्या अनुसूचीच्या भाग एकमध्ये निर्दिष्ट केलेली राज्यक्षेत्रे.) हा मजकूर शवटी जादा दाखल करण्यात येईल;
ख) पश्चिम बंगाल राज्याच्या राज्यक्षेत्रांशी संबंधित असणाऱ्या परिच्छेदामध्ये, (आणि तसेच संविधान (नववी सुधारणा) अधिनियम १९६० याच्या कलम ३ च्या खंड (ग) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जेथववर त्याचा संविधान (शंभरावी सुधारणा) अधिनियम २०१५ याच्या पहिल्या अनुसूचीच्या भाग तीनमध्ये निर्दिष्ट केलेल्या राज्यक्षेत्रांशी आणि दुसऱ्या अनुसूचीच्या भाग तीनमध्ये निर्दिष्ट केलेल्या राज्यक्षेत्रांशी संबंध आहे तेथवर, संविधान (शंभरावी सुधारणा) अधिनियम २०१५ याच्या पहिल्या अनुसूचीच्या भाग तीनमध्ये निर्दिष्ट केलेली राज्यक्षेत्रे परंतु दुसऱ्या अनुसूचीच्या भाग तीनमध्ये निर्दिष्ट केलेली राज्यक्षेत्रे वगळून.) हा मजकुर शवटी जादा दाखल करण्यात येईल;
ग) मेघालय राज्याच्या राज्यक्षेत्रांशी संबंधित असणाऱ्या परिच्छेदामध्ये (आणि संविधान (शंभरावी सुधारणा) अधिनियम २०१५ याच्या पहिल्या अनुसूचीच्या भाग एकमध्ये निर्दिष्ट केलेली राज्यक्षेत्रे परंतु दुसऱ्या अनुसूचीच्या भाग दोनमध्ये निर्दिष्ट केलेली राज्यक्षेत्रे वगळून.) हा मजकूर शवटी जादा दाखल करण्यात येईल;
घ) त्रिपुरा राज्याच्या राज्यक्षेत्रांशी संबंधित असणाऱ्या परिच्छेदामध्ये, (आणि संविधान (नववी सुधारणा) अधिनियम १९६० याच्या कलम ३ च्या खंड (घ) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जेथवर त्याचा संविधान (शंभरावी सुधारणा) अधिनियम २०१५ याच्या पहिल्या अनुसूचीच्या भाग दोनमध्ये निर्दिष्ट केलेल्या राज्यक्षेत्रांशी संबंध आहे तेथवर, संविधान (शंभरावी सुधारणा) अधिनियम २०१५ याच्या पहिल्या अनुसूचीच्या भाग दोनमध्ये निर्दिष्ट केलेली राज्यक्षेत्रे.) हा मजकूर शेवटी जादा दाखल करण्यात येईल.
पहिली अनुसूची :
(अनुच्छेद २ (क), २ (ख) व ३ पहा)
भाग एक
दिनांक १६ में, १९७४ रोजीच्या करारातील अनुच्छेद २ आणि दिनांक ६ सप्टेंबर २०११ रोजीच्या कराराच्या मूळ मसुद्याच्या अनुच्छेद ३ (एक) (ख) (दोन) (तीन) (चार) (पाच) यांच्या संबंधातील संपादीत केलेले राज्यक्षेत्र.
भाग दोन
दिनांक १६ में, १९७४ रोजीच्या करारातील अनुच्छेद २ आणि दिनांक ६ सप्टेंबर २०११ रोजीच्या काराराच्या मूळ मसुद्यातील अनुच्छेद ३ (एक) (ग) (एक) यांच्या संबंधातील संपादित केलेले राज्यक्षेत्र.
भाग तीन
दिनांक १६ मे, १९७४ रोजीच्या कारारातील अनुच्छेद १ (१२) व २ आणि दिनांक ६ सप्टेंबर, २०११ रोजीच्या कराराच्या मूळ मसुद्यातील अनुच्छेद २ (दोन), ३ (एक) (क) (तीन) (चार) (पाच) (सहा) यांच्या संबंधातील संपादित केलेले राज्यक्षेत्र.
दुसरी अनुसूची :
(अनुच्छेद २ (ख), २ (घ) व ३ पहा)
भाग एक
दिनांक १६ मे १९७४ रोजीच्या करारातील अनुच्छेद २ आणि दिनांक ६ सप्टेंबर २०११ रोजीच्या कराराच्या मूळ मसुद्यातील अनुच्छेद ३ (एक) (घ) (एक) (दोन) यांच्या संबंधातील हस्तांतरित केलेले राज्यक्षेत्र.
भाग दोन
दिनांक १६ मे १९७४ रोजीच्या करारातील अनुच्छेद २ आणि दिनांक ६ सप्टेंबर २०११ रोजीच्या कराराच्या मूळ मसुद्यातील अनुच्छेद ३ (एक) (ख) (एक) यांच्या संबंधातील हस्तांतरित केलेले राज्यक्षेत्र.
भाग तीन
दिनांक १६ में १९७४ रोजीच्या करारातील अनुच्छेद १ (१२) व २ आणि दिनांक ६ सप्टेंबर २०११ रोजीच्या कराराच्या मूळ मसुद्यातील अनुच्छेद २ (दोन), ३ (एक), (क) (एक) (दोन) (सहा) यांच्या संबंधातील हस्तांतरित केलेले राज्यक्षेत्र.
तिसरी अनुसूची
(अनुच्छेद २ (ग) पहा)
एक. भारत व बांग्लादेश यांच्यामधील भूसीमांचे सीमांकन व संबंधित बाबी यांच्याशी संबंधित असणारा भारताचे गणराज्य सरकार व बांग्लादेशाचे जनवादी गणराज्य सरकार यांच्यामध्ये दिनांक १६ मे, १९७४ रोजी झालेल्या करारातील उतारे.
अनुच्छेद १ (१२) : विदेशी अंत:क्षेत्र (एन्क्लेव्हज्) :
बांग्लादेशला दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त क्षेत्रासाठी नुकसानभरपाईचा दावा न करता, परिच्छेद १४ मध्ये नमूद केलेल्या विदेशी अंत:क्षेत्रांखेरीज बांग्लादेशामधील भारतीय विदेशी अंत:क्षेत्रांची आणि भारतामधील बांग्लादेशाच्या विदेश अंत:क्षेत्रांची तातडीने अदलाबदल केली पाहिजे.
अनुच्छेद २ :
ज्याच्या बाबतीत, सीमा पट्टी नकाशे अगोदरच तयार केले आहेत अशा अगोदरच सीमांकन केलेल्या क्षेत्रांमधील प्रतिकूल कब्जा असलेल्या राज्यक्षेत्रांची अधिराजदूतांनी सीमा पट्टी नकाशांवर स्वाक्षरी केल्यापासून सहा महिन्यांच्या आत, अदलाबदल करण्यात येईल यास भारताच्या व बांग्लादेशाच्या सरकारांची संमती आहे. ते, संबंधित नकाशांवर, शक्य तितक्या लवकर आणि कोणत्याही बाबतीत, ३१ डिसेेंबर १९७४ च्या आत सह्या करु शकतील. जेथील सीमांकन अगोदरच करण्यात आले असेल अशा इतर क्षेत्रांच्या बाबतीतील नकाशे छापण्याच्या उपायोजना लवकरात लवकर हाती घेण्यात याव्यात. या क्षेत्रांमधील प्रतिकूपलपणे धारण केलेल्या कब्जांची अदलाबदल ३१ डिसेंबर १९७५ पर्यंत करण्यात यावी यादृष्टीने, हे नकाशे, ३१ मे, १९७५ पर्यंत छापावेत आणि त्यानंतर अधिराजदूतांनी त्यावर स्वाक्षऱ्या कराव्यात. अजूनही सीमांकन करावयाचे राहिलेल्या क्षेत्रांमध्ये, संबंधित सीमा पट्टी नकाशांवर अधिराजदूतांनी स्वाक्षरी केल्यापासून सहा महिन्यांच्या आत प्रादेशिक अधिकारक्षेत्राचे हस्तांतरण करण्यात यावे.
दोन. भारत व बांग्लादेश यांच्यामधील भूसीमांचे सीमांकन व संबंधित बाबी यांच्याशी संबंधित असणारा भारताचे गणराज्य सरकार व बांग्लादेशाचे जनवादी गणराज्य सरकार यांच्यामध्ये दिनांक ६ सप्टेंबर २०११ रोजी झालेल्या कराराच्या मूळ मसुद्यातील उतारे.
अुच्छेद २ :
(दोन) १९७४ च्या कराराच्या अनुच्छेद १ च्या खंड १२ ची पुढील प्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल :-
विदेशी अंत:क्षेत्र (एन्क्लेव्हज्) :
एप्रिल १९९७ मध्ये महासंचालक, भूमी अभिलेख व सर्वेक्षण, बांग्लादेश व संचालक, भूमी अभिलेख व सर्वेक्षण, पश्चिमबंगाल (भारत) यांच्या स्तरावर संयुक्तरीत्या पडताळणी केलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या भूकर विदेशी अंत:क्षेत्राच्या नकाशांनुसार, बांग्लादेशमधील १११ भारतीय विदेशी अंत:क्षेत्रांची व भारतामधील ५१ बांग्लादेशीय विदेशी अंत:क्षेत्रांची, बांग्लादेशाला दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त क्षेत्रांसाठी नुकसानभरपाईचा दावा न करता अदलाबदल करण्यात येईल.
अनुच्छेद ३ :
एक) १९७४ च्या कराराच्या अनुच्छेद २ ची पुढीलप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येईल :-
संयुक्त सर्वेक्षणाद्वारे निर्धारित केल्याप्रमाणे आणि डिसेंबर २०१० व ऑगस्ट, २०११ मध्ये दोन्ही देशांच्या भूमी अभिलेख व सर्वेक्षण विभागांनी अंतिम रुप दिलेल्या प्रतिकूल कब्जा असलेल्या संबंधित भूमी क्षेत्राच्या दर्शक नकाशामध्ये (एपीएल नकाशामध्ये) पूर्णत: रेखाटन केल्याप्रमाणे, प्रतिकूल कब्जातील धारण केलेल्या राज्यक्षेत्रांसाठी निश्चित केलेली सीमा म्हणून एक सीमा आखण्यात येईल यास भारत सरकारची व बांग्लादेश सरकारची संमती असून खालील खंड (क) ते (घ) मध्ये त्यांचे संपूर्ण वर्णन केलेले आहे.
अधिराजदूतांकडून संबंधित अदलाबदल करण्याबरोबरच प्रादेशिक अधिकारक्षेत्राचे हस्तांतरण एकाचवेळी पूर्ण करण्यात येईल. वर नमूद केलेल्या दर्शक नकाशांमध्ये रेखाटन केल्याप्रमाणे, सीमेचे सीमांकन खालील प्रमाणे करण्यात येईल :-
क) पश्चिम बंगाल क्षेत्र :
एक) बौसमारी – मधुगरी (कुश्तिया – नाडिया) क्षेत्र.
जून, २०११ मध्ये संयुक्तपणे सर्वेक्षण केल्याप्रमाणे व संमती दिल्याप्रमाणे, १९६२ च्या एकत्रीकृत नकाशामध्ये रेखाटन केल्याप्रमाणे, विद्यमान सीमा स्तंभ क्रमांक १५४ / ५ – एस पासून ते १५७ / १ – एस च्या दिशेने मथबंगा नदीच्या जुन्या प्रवाहाच्या मध्यापर्यत सीमारेषा आखण्यात येईल.
दोन) अंधारकोटा (कुश्तिया – नाडिया) क्षेत्र.
जून, २०११ मध्ये संयुक्तपणे सर्वेक्षण केल्याप्रमाणे व संमती दिल्याप्रमाणे, विद्यमान सीमा स्तंभ क्रमांक १५२ / ५ – एस पासून ते सीमा स्तंभ क्रमांक १५३ / १ – एस च्या दिशेने विद्यमान मथबंगा नदीच्या काठापर्यंत सीमारेषा आखण्यात येईल.
तीन) पुकरिया (कुश्तिया – नाडिया) क्षेत्र.
जून, २०११ मध्ये संयुक्तपणे सर्वेक्षण केल्याप्रमाणे व संमती दिल्याप्रमाणे, विद्यमान सीमा स्तंभ क्रमांक १५१ / १ – एस पासून ते सीमा स्तंभ क्रमांक १५२ / २ – एस च्या दिशेने मथबंगा नदीच्या काठापर्यंत सीमारेषा आखण्यात येईल.
(चार) चार महिष्कुंडी (कुश्तिया – नाडिया) क्षेत्र.
जून, २०११ मध्ये संयुक्तपणे सर्वेक्षण केल्याप्रमाणे व संमती दिल्याप्रमाणे, विद्यमान सीमा स्तंभ क्रमांक १५३/१ – एस पासून ते सीमास्तंभ क्रमांक १५३ / ९ – एस च्या दिशेने मथबंगा नदीच्या काठापर्यंत सीमारेषा आखण्यात येईल.
पाच) हरिपाल / खुतादाह / बटोली / सपामेरी / एलएनपूर (पटारी) (नौगांव – मालदा) क्षेत्र.
विद्यमान सीमा स्तंभ क्रमांक २४२ / एस / १३ पासून सीमा स्तंभ क्रमांक २४३ / ७-एस / ५ ला जोडणारी रेषा असल्याप्रमाणे आणि जून, २०११ मध्ये संयुक्त सर्वेक्षण केल्याप्रमाणे व संमती दिल्याप्रमाणे, सीमारेषा आखण्यात येईल.
सहा) बेरुबारी (पंचगढ – जलपाईगुडी) क्षेत्र.
१९९६ – १९९८ मध्ये संयुक्तपणे सीमांकन केल्याप्रमाणे, बांग्लादेशाकडून प्रतिकूलपणे धारण केलेल्या बेरुबारी (पंचगढ – जलपाईगुढी), आणि भारताकडून प्रतिकूलपणे धारण केलेल्या बेरुबारी व qसघपारा – खुडीपारा (पंचगढ – जलपाईगुढी) क्षेत्रामध्ये सीमारेषा आखण्यात येईल.
ख) मेघालय क्षेत्र :
एक) लोबाचेरा – नूनचेरा.
डिसेंबर २०१० मध्ये संयुक्तपणे सीमांकन केल्याप्रमाणे व संमती दिल्याप्रमाणे, लईलांग-बलिचेरामधील विद्यमान सीमा स्तंभ क्रमांक १३१५ / ४ – एस, लइलांग – नुनचेरामधील सीमा स्तंभ क्रमांक १३१६ / १ – एस ते सीमा स्तंभ क्रमांक १३१६ / १ – एस, लईलंग – लहिलिंगमधील सीमा स्तंभ क्रमांक १३१७ ते सीमा स्तंभ क्रमांक १३१७ / १३ – एस आणि लईलांग-लोभाचेरामधील सीमा स्तंभ क्रमांक १३१८ / १ – एस ते सीमा स्तंभ क्रमांक १३१८ / २ – एस च्या दिशेने चहामळ्यांच्या काठापर्यंत सीमारेषा आखण्यात येईल.
दोन) पिरडीवाह / पडुआक्षेत्र.
संयुक्तपणे सर्वेक्षण केल्याप्रमाणे आणि परस्पर संमती दिल्याप्रमाणे, विद्यमान सीमा स्तंभ क्रमांक १२७० / १ – एस पासून ते सीमा स्तंभ क्रमांक १२७१ / १ – टी पर्यंत सीमारेषा आखण्यात येईल. संमती दिलेल्या नकाशाच्या qबदू क्रमांक ६ जवळ पियांग नदीतून पाणी घेण्याची पिरडीवाह गावातील भारतीय नागरिकांना परवनगी देण्यात येईल यास पक्षकारांनी संमती दिली आहे.
तीन) लिंगखाट क्षेत्र.
कक) लिंगखाट – एक / कुलुमचेरा व लिंगखाट – दोन / कुलुमचेरा.
संयुक्तपणे सर्वेक्षण केल्याप्रमाणे आणि परस्पर संमती दिलेल्या रेषेप्रमाणे, विद्यमान सीमा स्तंभ क्रमांक १२६४ / ४ – एस पासून सीमा स्तंभ क्रमांक १२६५ आणि सीमा स्तंभ क्रमांक १२६५ / ६ – एस ते १२६५ / ९ – एस पर्यंत सीमारेषा आखण्यात येईल.
कख) लिंगखाट – तीन / सोनारहाट.
विद्यमान सीमा स्तंभ क्रमांक १२६६ / १३ – एस पासून दक्षिणेकडील नाल्याच्या बाजूने पूर्व-पश्चिम दिशेने ती दुसऱ्या नाल्याचा जाऊन मिळेपर्यंत सीमारेषा आखण्यात येईल, त्यांनरत ती, पर्वेकडील नाल्याया उत्तर किनाऱ्यापासून निघून संदर्भ स्तंभ क्रमांक १२६७ / ४ – आर -बीव १२६७ / ३ – आर – आय च्या उत्तरेकडे विद्यमान आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत जाईल.
चार) दावकी / तमाबिल क्षेत्र.
विद्यमान सीमा स्तंभ क्रमांक १२७५ / १ – एस ते सीमा स्तंभ क्रमांक १२७५ / ७ – एस यांना जोडणाऱ्या एका सरळ रेषेत सीमारेषा आखण्यात येईल. या क्षेत्रामध्ये शून्यरेषे वर कुंपण घालण्यास पक्षकारांची संमती आहे.
पाच) नलजुरी / श्रीपूर क्षेत्र.
कक) नलजुरी – एक.
सीमारेषा ही, ती, सीमा स्तंभ क्रमांक १२७७ / ५ – टी पासून वाहणाऱ्या नाल्यास मिळेपर्यंत, दक्षिण दिशेने विद्यमान सीमा स्तंभ क्रमांक १२७७ / २ – एस पासून ते पट्टी नकाशा क्रमांक १६६ मध्ये दर्शविल्याप्रमाणे तीन भूखंडांपर्यंत, रेषा असेल, त्यांनतर ती, दक्षिण दिशेने नाल्याच्या पश्चिम काठाच्या बाजूने बांग्लादेशाच्या बाजूला असलेल्या २ भूखंडांपर्यंत जाईल, त्यानंतर ती, सीमा स्तंभ क्रमांक १२७७ / ४ – एस पासून दक्षिण दिशेला काढलेल्या रेषेस मिळेपर्यंत, पूर्वेकडे जाईल.
कख) नलजुरी – तीन.
विद्यमान सीमा स्तंभ क्रमांक १२७८ / २ – एस पासून ते सीमा स्तंभ क्रमांक १२७९ / ३ – एस पर्यंत सीमारेषा, एका सरळ रेषेत आखण्यात येईल.
सहा) मुक्तापूर / डिबिर हावोर क्षेत्र.
भारतीय नागरिकांना, काली मंदिराला भेट देण्याची मुभा देण्यात येईल आणि मुक्तापूर बाजूच्या किनाऱ्याकडून मुक्तापूर / डिबिर हावोर क्षेत्रामधील जलाशयातील पाणी काढण्यास आणि मासेमारी करण्याच्या हक्कांचा वापर करण्यास देखील मुभा देण्यात येईल यास पक्षकारांची संमती आहे.
ग) त्रिपुरा क्षेत्र :
एक) त्रिपुरा / मौलवी बाजार क्षेत्रांमधील चंदननगर – चंपाराई चहाबाग क्षेत्र.
जुलै, २०११ मध्ये संयुक्तपणे सर्वेक्षण केल्याप्रमाणे आणि संमती दिल्याप्रमाणे, विद्यमान सीमा स्तंभ क्रमांक १Ÿ९०४ पासून ते सीमा स्तंभ क्रमांक १९०५ पर्यंत सोनराईछेरा नदीच्या बाजूने सीमारेषा आखण्यात येईल.
घ) आसाम क्षेत्र :
एक) आसाम क्षेत्रांमधील कालाबारी (बोरोईबारी) क्षेत्र.
ऑगस्ट, २०११ मध्ये संयुक्तपणे सर्वेक्षण केल्याप्रमाणे आणि संमती दिल्याप्रमाणे, विद्यमान सीमा स्तंभ क्रमांक १०६६ / २४ – टी पासून ते सीमा स्तंभ क्रमांक १०६७ / १६ – टी पर्यंत सीमारेषा आखण्यात येईल.
दोन) आसाम क्षेत्रांमधील पल्लाथाल क्षेत्र.
विद्यमान सीमा स्तंभ क्रमांक १३७० / ३ – एस पासून ते सीमा स्तंभ क्रमांक १३७१ / ६ – एस ते पुढे चहामळ्याच्या बाहेरील बाजूच्या दिशेने आणि सीमास्तंभ क्रमांक १३७२ पासून १३७३ / २ – एस पर्यंत पानमळ्याच्या बाहेरील सीमारेषा आखण्यात येईल.
तीन) दिनांक १६ मे, १९७४ च्या करारातील अनुच्छेद १ (१२) आणि दिनांक ६ सप्टेंबर, २०११ च्या करारातील मूळ मसुद्यांनुसार, भारत व बांग्लादेश यांच्यामधील विदेशी अंत: क्षेत्रांच्या अदलाबदलीची सूची.
——-
क. बांगलादेशामध्ये अदलाबदल करण्यायोग्य भारतीय विदेशी अंत:क्षेत्रे, क्षेत्रपळासहित
——–
अ. क्र – छिटांचे नाव – छिट क्रमांक – बांग्लादेश पोलीस ठाण्याच्या कक्षेत असणारे – पश्चिम बंगाल पोलीस ठाण्याच्या कक्षेत असणारे – क्षेत्रफळ एकरांमध्ये
——–
१ – २ – ३ – ४ – ५ – ६
——–
क. स्वतंत्र छिटा असलेली विदेशी अंत:क्षेत्रे (एन्क्लेव)
१. – गारटी – ७५ – पोचागर – हल्दीबारी – ५८.२३
२. – गारटी – ७६ – पोचागर – हल्दीबारी – ०.७९
३. – गारटी – ७७ – पोचागर – हल्दीबारी – १८
४. – गारटी – ७८ – पोचागर – हल्दीबारी – ९५८.६६
५. – गारटी – ७९ – पोचागर – हल्दीबारी – १.७४
६. – गारटी – ८० – पोचागर – हल्दीबारी – ७३.७५
७. – बिंगिमारी भाग – १ – ७३ – पोचागर – हल्दीबारी – ६.०७
८. – नझिरगंज – ४१ – बोड़ा – हल्दीबारी – ५८.३२
९. – नझिरगंज – ४२ – बोड़ा – हल्दीबारी – ४३४.२९
१०. – नझिरगंज – ४४ – बोड़ा – हल्दीबारी – ५३.४७
११. – नझिरगंज – ४५ – बोड़ा – हल्दीबारी – १.०७
१२. – नझिरगंज – ४६ – बोड़ा – हल्दीबारी – १७.९५
१३. – नझिरगंज – ४७ – बोड़ा – हल्दीबारी – ३.८९
१४. – नझिरगंज – ४८ – बोड़ा – हल्दीबारी – ७३.२७
१५. – नझिरगंज – ४९ – बोड़ा – हल्दीबारी – ४९.०५
१६. – नझिरगंज – ५० – बोड़ा – हल्दीबारी – ५.०५
१७. – नझिरगंज – ५१ – बोड़ा – हल्दीबारी – ०.७७
१८. – नझिरगंज – ५२ – बोड़ा – हल्दीबारी – १.०४
१९. – नझिरगंज – ५३ – बोड़ा – हल्दीबारी – १.०२
२०. – नझिरगंज – ५४ – बोड़ा – हल्दीबारी – ३.८७
२१. – नझिरगंज – ५५ – बोड़ा – हल्दीबारी – १२.१८
२२. – नझिरगंज – ५६ – बोड़ा – हल्दीबारी – ५४.०४
२३. – नझिरगंज – ५७ – बोड़ा – हल्दीबारी – ८.२७
२४. – नझिरगंज – ५८ – बोड़ा – हल्दीबारी – १४.२२
२५. – नझिरगंज – ६० – बोड़ा – हल्दीबारी – ०.५२
२६. – पुतिमारी – ५९ – बोड़ा – हल्दीबारी – १२२.८
२७. – दैखाता छट – ३८ – बोड़ा – हल्दीबारी – ४९९.२१
२८. – सल्बरी – ३७ – बोड़ा – हल्दीबारी – ११८८.९३
२९. – काजल दिघी – ३६ – बोड़ा – हल्दीबारी – ७७१.४४
३०. – नटकटोका – ३२ – बोड़ा – हल्दीबारी – १६२.२६
३१. – नटकटोका – ३३ – बोड़ा – हल्दीबारी – ०.२६
३२. – बेडलाडांगा छट – ३५ – बोड़ा – हल्दीबारी – ०.८३
३३. – बलापारा इगराबार – ३ – देबीगंज – हल्दीबारी – १७५२.४४
३४. – बरा खनकीखरिजा सीतलदहा – ३० – डिमला – हल्दीबारी – ७.७१
३५. – बरा खनकीखरिजा सीतलदहा – २९ – डिमला – हल्दीबारी – ३६.८३
३६. – बराखनगीर – २८ – डिमला – हल्दीबारी – ३०.५३
३७. – नगरजीकोबारी – ३१ – डिमला – हल्दीबारी – ३३.४१
३८. – कुचलीबारी – २६ – पटग्राम – मेकलीगंज – ५.७८
३९. – कुचलीबारी – २७ – पटग्राम – मेकलीगंज – २.०४
४०. – बरा कुचलीबारी – मेकलीगंज पोलीस ठाण्याच्या जे. एल. १०७ चा खंड – पटग्राम – मेकलीगंज – ४.३५
४१. – जमालदहा – बलापुखारी – ६ – पटग्राम – मेकलीगंज – ५.२४
४२. – उपोनचौकी कुचलीबारी – ११५/२ – पटग्राम – मेकलीगंज – ०.३२
४३. – उपोनचौकी कुचलीबारी – ७ – पटग्राम – मेकलीगंज – ४४.०४
४४. – भोथनरी – ११ – पटग्राम – मेकलीगंज – ३६.८३
४५. – बालापुखारी – ५ – पटग्राम – मेकलीगंज – ५५.९१
४६. – बाराखानगीर – ४ – पटग्राम – मेकलीगंज – ५०.५१
४७. – बाराखानगीर – ९ – पटग्राम – मेकलीगंज – ८७.४२
४८. – छठ बोगडोकरा – १० – पटग्राम – मेकलीगंज – ४१.७
४९. – रतनपुर – ११ – पटग्राम – मेकलीगंज – ५८.९१
५०. – बोगडोकरा – १२ – पटग्राम – मेकलीगंज – २५.४९
५१. – फुलकर डाबरी – मेकलीगंज पोलीस ठाण्याच्या जे. एल. १०७ चा खंड – पटग्राम – मेकलीगंज – ०.८८
५२. – खरखरिया – १५ – पटग्राम – मेकलीगंज – ६०.७४
५३. – खरखरिया – १३ – पटग्राम – मेकलीगंज – ५१.६२
५४. – लोटामारी – १४ – पटग्राम – मेकलीगंज – ११०.९२
५५. – भूतबारी – १६ – पटग्राम – मेकलीगंज – २०५.४६
५६. – कोमट चांग्रबंधा – १६ए – पटग्राम – मेकलीगंज – ४२.८
५७. – कोमाट चांग्रबंधा – १७ए – पटग्राम – मेकलीगंज – १६.०१
५८. – पनीसला – १७ – पटग्राम – मेकलीगंज – १३७.६६
५९. – द्वारिकामारी खासबाश – १८ – पटग्राम – मेकलीगंज – ३६.५
६०. – पनीसला – १५३/पी – पटग्राम – मेकलीगंज – ०.२७
६१. – पनीसला – १५३/ओ – पटग्राम – मेकलीगंज – १८.०१
६२. – पनीसला – १९ – पटग्राम – मेकलीगंज – ६४.६३
६३. – पनीसला – २१ – पटग्राम – मेकलीगंज – ५१.४
६४. – लोटामारी – २० – पटग्राम – मेकलीगंज – २८३.५३
६५. – लोटामारी – २२ – पटग्राम – मेकलीगंज – ९८.८५
६६. – द्वारिकामारी – २३ – पटग्राम – मेकलीगंज – ३९.५२
६७. – द्वारिकामारी – २५ – पटग्राम – मेकलीगंज – ४५.७३
६८. – छत भोथाट – २४ – पटग्राम – मेकलीगंज – ५६.११
६९. – बाकाटा – १३१ – पटग्राम – हथभंगा – २२.३५
७०. – बाकाटा – १३२ – पटग्राम – हथभंगा – ११.९६
७१. – बाकाटा – १३० – पटग्राम – हथभंगा – २०.४८
७२. – भोग्रामगुरी – १३३ – पटग्राम – हथभंगा – १.४४
७३. – चेनाकाटा – १३४ – पटग्राम – मेकलीगंज – ७.८१
७४. – बांसकाटा – ११९ – पटग्राम – मथबंगा – ४१३.८१
७५. – बांसकाटा – १२० – पटग्राम – मथबंगा – ३०.७५
७६. – बांसकाटा – १२१ – पटग्राम – मथबंगा – १२.१५
७७. – बांसकाटा – ११३ – पटग्राम – मथबंगा – ५७.८६
७८. – बांसकाटा – ११२ – पटग्राम – मथबंगा – ३१५.०४
७९. – बांसकाटा – ११४ – पटग्राम – मथबंगा – ०.७७
८०. – बांसकाटा – ११५ – पटग्राम – मथबंगा – २९.२
८१. – बांसकाटा – १२२ – पटग्राम – मथबंगा – ३३.२२
८२. – बांसकाटा – १२७ – पटग्राम – मथबंगा – १२.७२
८३. – बांसकाटा – १२८ – पटग्राम – मथबंगा – २.३३
८४. – बांसकाटा – ११७ – पटग्राम – मथबंगा – २.५५
८५. – बांसकाटा – ११८ – पटग्राम – मथबंगा – ३०.९८
८६. – बांसकाटा – १२५ – पटग्राम – मथबंगा – ०.६४
८७. – बांसकाटा – १२६ – पटग्राम – मथबंगा – १.३९
८८. – बांसकाटा – १२९ – पटग्राम – मथबंगा – १.३७
८९. – बांसकाटा – ११६ – पटग्राम – मथबंगा – १६.९६
९०. – बांसकाटा – १२३ – पटग्राम – मथबंगा – २४.३७
९१. – बांसकाटा – १२४ – पटग्राम – मथबंगा – ०.२८
९२. – गोटामारी छिट – १३५ – हातिबंधा – सितलकुची – १२६.५९
९३. – गोटामारी छिट – १३६ – हातिबंधा – सितलकुची – २०.०२
९४. – बनापचाई – १५१ – लालमोनिरहाट – दिनहाटा – २१७.२९
९५. – बनापचाई भितरकुथी – १५२ – लालमोनिरहाट – दिनहाटा – ८१.७१
९६. – दसिआर छारा – १५० – फुलबारी – दिनहाटा – १६४३.४४
९७. – दकुरहाट-दकिनिरकुथी – १५६ – कुरीग्राम – दिनहाटा – १४.२७
९८. – कलामती – १४१ – भुरुंगामारी – दिनहाटा – २१.२१
९९. – भाहोबगंज – १५३ – भुरुंगामारी – दिनहाटा – ३१.५८
१००. – बाओतिकुरसा – १४२ – भुरुंगामारी – दिनहाटा – ४५.६३
१०१. – बरा कोआचुल्का – १४३ – भुरुंगामारी – दिनहाटा – ३९.९९
१०२. – गावचुल्का २ – १४७ – भुरुंगामारी – दिनहाटा – ०.९
१०३. – गावचुल्का १ – १४६ – भुरुंगामारी – दिनहाटा – ८.९२
१०४. – दिघालतारी २ – १४५ – भुरुंगामारी – दिनहाटा – ८.८१
१०५. – दिघालतारी १ – १४४ – भुरुंगामारी – दिनहाटा – १२.३१
१०६. – छोटूगरलझोरा २ – १४९ – भुरुंगामारी – दिनहाटा – १७.८५
१०७. – छोटूगरलझोरा १ – १४८ – भुरुंगामारी – दिनहाटा – ३५.७४
१०८. – जे. एल. क्र. ३८ चे दक्षिणे कडील आणि जे. एल. क्र. ३९ चे दक्षिणेकडील *. नाव आणि जे. एल. क्र. नसलेले १ छिट (स्थानिक ठिकाणी अशोकाबारी **. म्हणून ओळखले जाणारे) – १५७ – पटग्राम – मथभंगा – ३.५
——
ख. खंडित छिटा असलेली विदेशी अंत:क्षेत्रे
——
१०९. – एक) बेवलाडांगा – ३४ – हल्दीबारी – बोडा – ८६२.४६
दो) बेवलाडांगा – खंड – हल्दीबारी – देवीगंज
११०. – एक) कोतभाजनी – २ – हल्दीबारी – देवीगंज – २०१२.२७
दो) कोतभाजनी – खंड – हल्दीबारी – देवीगंज
तीन) कोतभाजनी – खंड – हल्दीबारी – देवीगंज
चार) कोतभाजनी – खंड – हल्दीबारी – देवीगंज
१११. – एक) दहाला – खागरबारी – हल्दीबाडी – देवीगंज – २६५०.३५
दो) दहाला – खंड – हल्दीबारी – देवीगंज
तीन) दहाला – खंड – हल्दीबारी – देवीगंज
चार) दहाला – खंड – हल्दीबारी – देवीगंज
पांच) दहाला – खंड – हल्दीबारी – देवीगंज
छह) दहाला – खंड – हल्दीबारी – देवीगंज
——-
एकूण : १७१६०.६३
——-
*. कोलकाता येथे २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २००२ पर्यंत घेतलेल्या १५० व्या (५४ व्या) भारत-बांग्लादेश सीमा परिषदेद्वारे सुधारणा केली.
**. कूचबिहार, भारत येथे १८ ते २० सप्टेंबर, २००३ पर्यंत घेतलेल्या १५२ व्या (५६ व्या) भारत बांग्लादेश सीमा परिषदेद्वारे सुधारणा केली.
——-
विदेशी अंत:क्षेत्रांच्या वर दिलेल्या तपशिलांची, कोलकाता येथे ९ ते १२ ऑक्टोबर, १९९६ दरम्यान झालेल्या भारत-बांग्लादेश परिषदेमध्ये तसेच जलपायगुडी (पश्चिम बंगाल) – पंचगढ (बांग्लादेश) येथे २१ ते २४ नोव्हेंबर १९९६ दरम्यान झालेल्या संयुक्त क्षेत्र निरीक्षणामध्ये, भारत व बांग्लादेश यांच्याकडे असलेल्या अभिलेखाबरोबर संयुक्तपणे तुलना करण्यात आली आहे व त्यांचा मेळ घालण्यात आला आहे.
टीप : क्षेत्रीय सीमन काळ, १९९६-९७ मध्ये संयुक्त भूमि पडताळणीद्वारे वरील अ. क्र. १०८ मधील विदेशी अंत:क्षेत्राचे नाव, अशोकबारी म्हणून निश्चित करण्यात आले आहे.
——-
ख. भारतामध्ये अदलाबदल करण्यायोग्य बांग्लादेशीय विदेशी अंत:क्षेत्रे, क्षेत्रफळासहित
——-
अ. क्र – छिटांचे नाव – पश्चिम बंगाल पोलीस ठाण्याच्या कक्षेत असणारे – बांग्लादेश पोलीस ठाण्याच्या कक्षेत असणारे – जे. एल. क्रमांक – क्षेत्रफळ एकरांमध्ये
———
१ – २ – ३ – ४ – ५ – ६
———
क. स्वतंत्र छिटा असलेली विदेशी अंत:क्षेत्रे
———
१. छिट कुचलीबारी – मेकलीगंज – पटग्राम – २२ – ३७०.६४
२. कुचलीबारीची छिट भूमि – मेकलीगंज – पटग्राम – २४ – १.८३
३. बालपुखारी – मेकलीगंज – पटग्राम – २१ – ३३१.६४
४. पनबारी सं० २ की छिट भूमि – मेकलीगंज – पटग्राम – २० – १.१३
५. छित पनबारी – मेकलीगंज – पटग्राम – १८ – १०८.५९
६. धबलसाटी मिर्गीपुर – मेकलीगंज – पटग्राम – १५ – १७३.८८
७. बामनदल – मेकलीगंज – पटग्राम – ११ – २.२४
८. छित धाबलसाटी – मेकलीगंज – पटग्राम – १४ – ६६.५८
९. धाबलसाटी – मेकलीगंज – पटग्राम – १३ – ६०.४५
१०. श्रीरामपुर – मेकलीगंज – पटग्राम – ८ – १.०५
११. जोते निज्जमा – मेकलीगंज – पटग्राम – ३ – ८७.५४
१२. जगतबेर नं.३ की छिट भूमि – मथबंगा – पटग्राम – ३७ – ६९.८४
१३. जगतबेर नंबर १ की छिट भूमि – मथबंगा – पटग्राम – ३५ – ३०.६६
१४. जगतबेर नंबर २ की छिट भूमि – मथबंगा – पटग्राम – ३६ – २७.०९
१५. छिट कोकोआबारी – मथबंगा – पटग्राम – ४७ – २९.४९
१६. छिट भंडारदाहा – मथबंगा – पटग्राम – ६७ – ३९.९६
१७. धाबलगुडी – मथबंगा – पटग्राम – ५२ – १२.५
१८. छिट धाबलगुरी – मथबंगा – पटग्राम – ५३ – २२.३१
१९. धाबलगुड़ी सं० ३ ची छिट भूमि – मथबंगा – पटग्राम – ७० – १.३३
२०. धाबलगुड़ी सं० ४ चीछिट भूमि – मथबंगा – पटग्राम – ७१ – ४.५५
२१. धाबलगुड़ी सं० ५ ची छिट भूमि – मथबंगा – पटग्राम – ७२ – ४.१२
२२. धाबलगुड़ी सं० १ ची छिट भूमि – मथबंगा – पटग्राम – ६८ – २६.८३
२३. धाबलगुड़ी सं० २ ची छिट भूमि – मथबंगा – पटग्राम – ६९ – १३.९५
२४. महिशमारी – सितलकुची – पटग्राम – ५४ – १२२.७७
२५. बुरा सरडुबी – सितलकुची – हतिंबधा – १३ – ३४.९६
२६. फलनापुर – सितलकुची – पटग्राम – ६४ – ५०५.५६
२७. अमझोल – सितलकुची – हातिंबधा – ५७ – १.२५
२८. किसमत बातरीगाछ – दिनहाटा – कालीगंज – ८२ – २०९.९५
२९. दुर्गापुर – दिनहाटा – कालीगंज – ८३ – २०.९६
३०. बंसुआ खामर गिटालदाहा – दिनहाटा – लालमोनिरहाट – १ – २४.५४
३१. पाओतुरकुथी – दिनहाटा – लालमोनिरहाट – ३७ – ५८९.९४
३२. पश्चिम बाकालीर छरा – दिनहाटा – भरुंगामारी – ३८ – १५१.९८
३३. मध्य बाकालीर छरा – दिनहाटा – भरुंगामारी – ३९ – ३२.७२
३४. पूर्व बाकालीर छरा – दिनहाटा – भरुंगामारी – ४० – १२.२३
३५. मध्य मसालडांगा – दिनहाटा – भरुंगामारी – ३ – १३६.६६
३६. मध्य छिट मसालडांगा – दिनहाटा – भरुंगामारी – ८ – ११.८७
३७. पश्चिम छिट मसालडांगा – दिनहाटा – भरुंगामारी – ७ – ७.६
३८. उत्तर मसालडांगा – दिनहाटा – भरुंगामारी – २ – २७.२९
३९. कचुआ – दिनहाटा – भरुंगामारी – ५ – ११९.७४
४०. उत्तर बंसजानी – तुफानगंज – भरुंगामारी – १ – ४७.१७
४१. छत तिलाई – तुफानगंज – भरुंगामारी – १७ – ८१.५६
——
ख. खंडित छिटा असलेली विदेशी अंत:क्षेत्रे
——
४२. (एक) नालग्राम – सितलकुची – पटग्राम – ६५ – १३९७.३४
(दो) नालग्राम (खंड) – सितलकुची – पटग्राम – ६५
(तीन) नालग्राम (खंड) – सितलकुची – पटग्राम – ६५
४३. (एक) छिट नालग्राम – सितलकुची – पटग्राम – ६६ – ४९.५
(दो) छिट नालग्राम (खंड) – सितलकुची – पटग्राम – ६६
४४. (एक) बतरीगाछ – दिनहाटा – कालीगंज – ८१ – ५७७.३७
(दो) बतरीगाछ (खंड) – दिनहाटा – कालीगंज – ८१
(तीन) बतरीगाछ (खंड) – दिनहाटा – फुलबारी – ९
४५. (एक) काराला – दिनहाटा – फुलबारी – ९ – २६९.९१
(दो) काराला (खंड) – दिनहाटा – फुलबारी – ९
(तीन) काराला (खंड) – दिनहाटा – फुलबारी – ८
४६. (एक) सिपप्रसाद मुस्ताती – दिनहाटा – फुलबारी – ८ – ३७३.२
(दो) सिपप्रसाद मुस्ताती (खंड) – दिनहाटा – फुलबारी – ६
४७. (एक) दक्षिण मसालडांगा – दिनहाटा – भरुंगामारी – ६ – ५७१.३८
(दो) दक्षिण मसालडांगा (खंड) – दिनहाटा – भरुंगामारी – ६
(तीन) दक्षिण मसालडांगा (खंड) – दिनहाटा – भरुंगामारी – ६
(चार) दक्षिण मसालडांगा (खंड) – दिनहाटा – भरुंगामारी – ६
(पांच) दक्षिण मसालडांगा (खंड) – दिनहाटा – भरुंगामारी – ६
(छह) दक्षिण मसालडांगा (खंड) – दिनहाटा – भरुंगामारी – ६
४८. (एक) पश्चिम मसालडांगा – दिनहाटा – भरुंगामारी – ४ – २९.४९
(दो) पश्चिम मसालडांगा (खंड) – दिनहाटा – भरुंगामारी – ४
४९. (एक) पुरबा छिट मसालडांगा – दिनहाटा – भरुंगामारी – १० – ३५.०१
(दो) पुरबा छिट मसालडांगा (खंड) – दिनहाटा – भरुंगामारी – १०
५०. (एक) पुरबा मसालडांगा – दिनहाटा – भरुंगामारी – ११ – १५३.८९
(दो) पुरबा मसालडांगा (खंड) – दिनहाटा – भरुंगामारी – ११
५१. (एक) उत्तर धालडांगा – तुफानगंज – भरुंगामारी – १४ – २४.९८
(दो) उत्तर धालडांगा (खंड) – तुफानगंज – भरुंगामारी – १४
(तीन) उत्तर धालडांगा (खंड) – तुफानगंज – भरुंगामारी – १४
——-
एकूण क्षेत्रफळ : ७११०.०२
——-
विदेशी अंत:क्षेत्रांच्या वर दिलेल्या तपशिलांची, कोलकाता येथे ९ ते १२ ऑक्टोबर, १९९६ दरम्यान झालेल्या भारत-बांग्लादेश परिषदेमध्ये तसेच जलपायगुडी (पश्चिम बंगाल) – पंचगढ (बांग्लादेश) येथे २१ ते २४ नोव्हेंबर १९९६ दरम्यान झालेल्या संयुक्त क्षेत्र निरीक्षणामध्ये, भारत व बांग्लादेश यांच्याकडे असलेल्या अभिलेखाबरोबर संयुक्तपणे तुलना करण्यात आली आहे व त्यांचा मेळ घालण्यात आला आहे.