भारताचे संविधान ( राज्यघटना )
१.(चौथी अनुसूची :
(अनुच्छेद ४(१) आणि ८० (२))
राज्यसभेतील जागांची वाटणी :
पुढील तक्त्याच्या पहिल्या स्तंभात विनिर्दिष्ट केलेल्या प्रत्येक राज्याला किंवा संघ राज्यक्षेत्राला तक्त्याच्या दुसऱ्या स्तंभात, त्या राज्यपुढे किंवा, यथास्थिति, त्या संघ राज्यक्षेत्रापुढे विनिर्दिष्ट केलेल्या जागा नेमून दिल्या जातील :-
तक्ता :
१) आंध्रप्रदेश – २.(११)
३.(२) तेलंगणा – ७)
४.(३) आसाम – ७
४.(४) बिहार – ५.(१६)
६.(४.(५) झारखंड – ६)
७.(८.(४.(६) गोवा – १))
९.(८.(४.(७) गुजरात – ११))
१०.(८.(४.(८) हरयाणा – ५))
८.(४.(९) केरळ – ९
८.(४.(१०) मध्यप्रदेश – ११.(११)
१२.(८.(४.(११) छत्तीसगढ – ५))
१३.(८.(४.(१२) तामिळनाडू – १४.(१८))
१५.(८.(४.(१३) महाराष्ट्र – १९))
१६.(८.(४.(१४) कर्नाटक – १२))
८.(४.(१५) १७.(ओडिशा) – १०)
८.(४.(१६) पंजाब – १८.(७)
८.(४.(१७) राजस्थान – १०)
८.(४.(१८) उत्तर प्रदेश – १९.(३१)
२०.(८.(४.(१९) २१.(उत्तराखंड) – ३))
८.(४.(२०) पश्चिम बंगाल – १६)
२२.(८.(४.(**) *** – *)
२३.(२४.(८.(४.(२१)) नागालँड – १)
२५.(८.(४.(२३.(२२) हिमाचल प्रदेश – ३)))
४.(८.(२२.(२३) मणिपूर – १)
४.(८.(२२.(२४) त्रिपुरा – १))
४.(८.(२२.(२५) मेघालय – १))
२६.(४.(८.(२२.(२६) सिक्कीम – १))
२७.(४.(८.(२२.(२७) मिझोरम – १))
२८.(४.(८.(२२.(२८) अरुणाचल प्रदेश – १))
४.(८.(२२.(२९) दिल्ली – ३)
४.(८.(२२.(३०) २९.(पुडुचेरी) – १))
३०.(४.(८.(२२.(३१) जम्मू व काश्मीर – ४)
——–
एकूण – ३१.(२३३))
———
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम १९५६ याच्या कलम ३ द्वारे (१-११-१९६५ पासून) चौथ्या अनुसूचीऐवजी दाखल केली.
२. आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम २०१४ च्याच्या कलम १२ द्वारा (२-६-२०१४ पासून) १८ याऐवजी समाविष्ट केले.
३. आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम २०१४ च्याच्या कलम १२ द्वारा (२-६-२०१४ पासून) समाविष्ट केले.
४. आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम २०१४ च्याच्या कलम १२ द्वारा (२-६-२०१४ पासून) क्रमांक २ ते ३० यांना क्रमांक ३ ते ३१ असे नवीन क्रमांक दिले.
५. बिहार पुनर्रचना अधिनियम २००० (२००० चा ३०) याच्या कलम ७ द्वारे २२ ऐवजी दाखल केला (१५ नोव्हेंबर २००० रोजी व तेव्हापासून).
६. बिहार पुनर्रचना अधिनियम २००० (२००० चा ३०) याच्या कलम ७ द्वारे समाविष्ट केला (१५ नोव्हेंबर २००० रोजी व तेव्हापासून).
७. गोवा, दमण व दीव पुनर्रचना अधिनियम १९८७ (१९८७ चा १८) याच्या कलम ६ द्वारे समाविष्ट केला (३० मे १९८७ रोजी व तेव्हापासून).
८. बिहार पनुर्रचना अधिनियम २००० (२००० चा ३०) याच्या कलम ७ द्वारे क्रमांक ४ ते २९ यांना क्रमांक ५ ते ३० असे नवीन क्रमांक दिले (१५ नोव्हेंबर २००० रोजी व तेव्हापासून).
९. मुंबई पुनर्रचना अधिनियम १९६० (१९६० चा ११) याच्या कलम ६ द्वारे क्रमांक ४ ऐवजी ६ असा नवीन क्रमांक दिला (१ में १९६० रोजी व तेव्हापासून).
१०. पंजाब पुनर्रचना अधिनियम १९६६ (१९६६ चा ३१) याच्या कलम ९ द्वारे समाविष्ट केला (१ नोव्हेंबर १९६६ रोजी व तेव्हापासून).
११. मध्य प्रदेश पुनर्रचना अधिनियम २००० (२००० चा २८) याच्या कलम ७ द्वारे १६ ऐवजी दाखल केला (१ नोव्हेंबर २००० रोजी व तेव्हापासून).
१२. मध्य प्रदेश पुनर्रचना अधिनियम २००० (२००० चा २८) याच्या कलम ७ द्वारे समाविष्ट केला (१ नोव्हेंबर २००० रोजी व तेव्हापासून).
१३. मद्रास राज्य (नाव बदलणे) अधिनियम १९६८ (१९६८ चा ५३) याच्या कलम ५ द्वारे ८ मद्रास याऐवजी दाखल केला (११ असा नवीन क्रमांक दिला) (१४ जानेवारी १९६९ रोजी व तेव्हापासून).
१४. आंध्रप्रदेश व मद्रास (सीमांमधील फेरबदल) अधिनियम १९५९ (१९५९ चा ५६) याच्या कलम ८ द्वारे १७ ऐवजी दाखल केला (१ एप्रिल १९६० रोजी व तेव्हापासून).
१५. मुंबई पुनर्रचना अधिनियम १९६० (१९६० चा ११) याच्या कलम ६ द्वारे समाविष्ट केला (१ मे १९६० रोजी व तेव्हापासून).
१६. म्हैसूर राज्य (नाव बदलणे) अधिनियम १९७३ (१९७३ चा ३१) याच्या कलम ५ द्वारे १० म्हैसूर याऐवजी दाखल केला (१३ असा नवीन क्रमांक दिला) (१ नोव्हेंबर १९७३ रोजी व तेव्हापासून).
१७. ओरिसा (नाव बदलणे) अधिनियम २०११ (२०११ चा १५) याच्या कलम ७ द्वारे ओरिसा या ऐवजी दाखल केला (१ नोव्हेंबर २०११ रोजी व तेव्हापासून).
१८. पंजाब पुनर्रचना अधिनियम १९६६ (१९६६ चा ३१) याच्या कलम ९ द्वारे ११ ऐवजी दाखल केला (१ नोव्हेंबर १९६६ रोजी व तेव्हापासून).
१९. उत्तरप्रदेश पुनर्रचना अधिनियम २००० (२००० चा २९) याच्या कलम ७ द्वारे ३४ ऐवजी दाखल केला (९ नोव्हेंबर २००० रोजी व तेव्हापासून)
२०. उत्तरप्रदेश पुनर्रचना अधिनियम २००० (२००० चा २९) याच्या कलम ७ द्वारे समाविष्ट केला (९ नोव्हेंबर २००० रोजी व तेव्हापासून).
२१. उत्तरांचल (नाव बदलणे) अधिनियम २००६ (२००६ चा ५२) याच्या कलम ५ द्वारे उत्तरांचल याऐवजी दाखल केला (१ जानेवारी २००७ रोजी व तेव्हापासून).
२२. जम्मू व काश्मीर पुनर्रचना अधिनियम २०१९ (२०१९ चा ३४) याच्या कलम ८ द्वारा (३१-१०-२०१९ पासून) जम्मू-काश्मीर संबंधित क्रमाकं वगळण्यात आला.
२३. जम्मू व काश्मीर पुनर्रचना अधिनियम २०१९ (२०१९ चा ३४) याच्या कलम ८ द्वारा (३१-१०-२०१९ पासून) क्रमांक २२ ते ३१ यांना क्रमांक २१ ते ३० असे नवीन क्रमांक दिले
२४. नागालँड राज्य अधिनियम १९६२ (१९६२ चा २७) याच्या कलम ६ द्वारे समाविष्ट केला (१ डिसेंबर १९६३ रोजी व तेव्हापासून).
२५. हिमाचल प्रदेश राज्य अधिनियम १९७० (१९७० चा ५३) याच्या कलम ५ द्वारे समाविष्ट केला (२५ जानेवारी १९७१ रोजी व तेव्हापासून).
२६. संविधान (छत्तिसावी सुधारणा) अधिनियम १९७५ याच्या कलम ४ द्वारे समाविष्ट केला (२६ एप्रिल १९७५ रोजी व तेव्हापासून).
२७. मिझोरम राज्य अधिनियम १९८६ (१९८६ चा ३४) याच्या कलम ५ द्वारे समाविष्ट केला (२० फेब्रुवारी १९८७ रोजी व तेव्हापासून).
२८. अरुणाचल प्रदेश राज्य अधिनियम १९८६ (१९८६ चा ६९) याच्या कलम ५ द्वारे समाविष्ट केला (२० फेब्रुवारी १९८७ रोजी व तेव्हापासून).
२९. पाँडेचरी (नाव बदलणे) अधिनियम २००६ (२००६ चा ४४) याच्या कलम ६ द्वारे पाँडेचरी याऐवजी दाखल केला (१ ऑक्टोबर २००६ रोजी व तेव्हापासून).
३०. जम्मू व काश्मीर पुनर्रचना अधिनियम २०१९ (२०१९ चा ३४) याच्या कलम ८ द्वारा (३१-१०-२०१९ पासून) क्रमांक ३० नंतर समाविष्ट करण्यात आले.
३१. गोवा, दमण व दीव पुनर्रचना अधिनियम १९८७ (१९८७ चा १८) याच्या कलम ६ द्वारे २३२ ऐवजी दाखल केला (३० में १९८७ रोजी व तेव्हापासून).