भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ८७ :
राष्ट्रपतीचे विशेष अभिभाषण :
(१) १.(लोकसभेच्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सत्राच्या प्रारंभी आणि प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या ) प्रारंभी, राष्ट्रपती, संसदेच्या एकत्र जमलेल्या दोन्ही सभागृहांना संबोधून अभिभाषण करील आणि तिला का अभिनिमंत्रित केले त्या कारणांची माहिती संसदेस देईल.
(२) अशा अभिभाषणात निर्देशिलेल्या बाबींच्या चचर्केरिता वेळ वाटून देण्यासाठी २.(***) दोन्ही सभागृहांच्या कार्यपद्धतीचे विनियमन करणाऱ्या नियमांद्वारे तरतूद केली जाईल.
————
१. संविधान (पहिली सुधारणा) अधिनियम, १९८१ याच्या कलम ७ द्वारे प्रत्येक सत्राच्या याऐवजी दाखल केले.
२. वरील अधिनियमाच्या कलम ७ द्वारे आणि अशा चर्चेला सभागृहाच्या अन्य कामकाजापेक्षा अग्रक्रम देण्यासाठी हा मजकूर गाळला.