भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ८० :
राज्य सभा की संरचना ।
(१) १.(२.(***) राज्यसभा)–
(क) खंड (३) च्या तरतुदींनुसार राष्ट्रपतीने नामनिर्देशित करावयाचे बारा सदस्य; आणि
(ख) राज्यांचे ३.( व संघ राज्यक्षेत्रांचे) दोनशे अडतीसपेक्षाअधिक नसतील इतके प्रतिनिधी, यांची मिळून बनलेली असेल.
(२) राज्यांच्या ४.(व राज्यक्षेत्रांच्या) प्रतिनिधींद्वारे भरावयाच्या राज्यसभेतील जागांची वाटणी चौथ्या अनुसूचीत अंतर्भूत असलेल्या त्यासंबंधीचय तरतुदींच्या अनुसार होईल.
(३) खंड (१) चा उपखंड (क) याअन्वये राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित करावयाचे सदस्य म्हणजे पुढे दिलेल्या बाबींसंबंधी विशेष ज्ञान किंवा
व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्ती असतील, त्या बाबी म्हणजे :—–
वाङमय, शास्त्र, कला व समाजसेवा.
(४) राज्यसभेतील ५.(***) प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी, त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांकडून प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे निवडून दिले जातील.
(५) राज्यसभेतील ६.(संघ राज्यक्षेत्रांचे) प्रतिनिधी, संसद कायद्याद्वारे विहित करील अशा रीतीने निवडले जातील.
———————-
१. संविधान (पस्तिसावी सुधारणा) अधिनियम, १९७४ याच्या कलम ३ द्वारे राज्यसभा या शब्दाऐवजी नवीन मजकूर दाखल केला (१ मार्च १९७५ रोजी व तेव्हापासून).
२. संविधान (छत्तिसावी सुधारणा) अधिनियम, १९७५ याच्या कलम ५ द्वारे दहाव्या अनुसूचीच्या परिच्छेद ४ मधील तरतुदींच्या अधीनतेने हा मजकूर गाळला (२६ एप्रिल १९७५ रोजी व तेव्हापासून).
३. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम ३ द्वारे हे शब्द जादा दाखल केले (१ नोव्हेंबर १९५६ रोजी व तेव्हापासून).
४. वरील अधिनियमाच्या कलम ३ द्वारे समाविष्ट केले (१ नोव्हेंबर १९५६ रोजी व तेव्हापासून).
५. वरील अधिनियमाच्या कलम ३ द्वारे पहिल्या अनुसूचीचा भाग क किंवा भाग ख यात उल्लेखिलेल्या हा मजकूर गाळला.
६. वरील अधिनियमाच्या कलम ३ द्वारे पहिल्या अनुसूचीचा भाग ग मध्ये उल्लेखिलेल्या राज्याचे या मजकुराऐवजी दाखल केला.