भारताचे संविधान ( राज्यघटना )
सरकारी कामकाज चालविणे
अनुच्छेद ७७ :
भारत सरकारचे कामकाज चालविणे :
(१) भारत सरकारची संपूर्ण शासकीय कारवाई राष्ट्रपतीच्या नावाने करण्यात येत आहे असे म्हटले जाईल.
(२) राष्ट्रपतीच्या नावाने केलेले आदेश व निष्पादित केलेले इतर संलेख, राष्ट्रपतीद्वारे करावयाच्या १.नियमांमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा रीतीने अधिप्रमाणित केले जातील आणि याप्रमाणे अधिप्रमाणित करण्यात आलेला आदेश किंवा संलेख, तो राष्ट्रपतीने केलेला किंवा निष्पादित केलेला आदेश किंवा संलेख नाही, या कारणावरून त्याची विधिग्राह्यता प्रश्नास्पद करता येणार नाही.
(३) भारत सरकारचे कामकाज अधिक सोयीस्कररीत्या चालावे यासाठी आणि उक्त कामकाज मंत्र्यांमध्ये वाटून देण्यासाठी राष्ट्रपती नियम करील.
२.(***)
———————
१. पहा, वेळोवेळी सुधारणा केलेली अधिसूचना क्रमांक एस. ओ. २२९७, दिनांक ३ नोव्हेंबर, १९५८, भारताचे राजपत्र, असाधारण , १९५८ भाग दोन, विभाग ३(दोन), इं. पृष्ठ १३१५.
२. संविधान (बेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम १४ द्वारे (३ जानेवारी १९७७ रोजी व तेव्हापासून) समाविष्ट केलेला खंड (४) हा संविधान (चव्वेचाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७८ याच्या कलम १२ द्वारे गाळला (२० जून १९७९ रोजी व तेव्हापासून).