भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ५८ :
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी अर्हता :
(१) कोणतीही व्यक्ती,—-
(क) भारतीय नागरिक ;
(ख) पस्तीस वर्षे पूर्ण वयाची ; आणि
(ग) लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हताप्राप्त, असल्याखेरीज राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही.
(२) एखादी व्यक्ती, भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य शासनाच्या नियंत्रणाखालील अथवा उक्त सरकारांपैकी कोणाच्याही नियंत्रणाधीन असलेल्या कोणत्याही स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणाच्या नियंत्रणाखालील, कोणतेही लाभाचे पद धारण करत असेल, तर, ती व्यक्ती, राष्ट्रपती म्हणून निवडून येण्यास पात्र असणार नाही.
स्पष्टीकरण :
या अनुच्छेदाच्या प्रयोजनांकरता, केवळ एखादी व्यक्ती ही संघराज्याचा राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती अथवा कोणत्याही राज्याचा राज्यपाल १.(***) आहे अथवा संघराज्याचा किंवा कोणत्याही राज्याचा मंत्री आहे, एवढ्याच कारणाने ती एखादे लाभाचे पद धारण करते, असे मानले जाणार नाही.
—————–
१. संविधान (सातवी सुधारणा) अधिनियम, १९५६ याच्या कलम २९ व अनुसूची यांद्वारे किंवा राजप्रमुख किंवा उपराजप्रमुख हा मजकूर गाळला.