Constitution अनुच्छेद ५३ : संघराज्याचा कार्यकारी अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ५३ :
संघराज्याचा कार्यकारी अधिकार :
(१) संघराज्याचा कार्यकारी अधिकार, राष्ट्रपतीकडे निहित असेल आणि त्याच्याकडून प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या हाताखालील अधिकायांमाङ्र्कत या संविधानानुसार त्याचा वापर केला जाईल.
(२) पूर्वगामी तरतुदींच्या व्यापकतेला बाध न येऊ देता, संघराज्याच्या संरक्षण दलांचे सर्वोच्च अधिपत्य राष्ट्रपतीकडे निहित असेल आणि त्याचा वापर कायद्याद्वारे विनियमित केला जाईल.
(३) या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे,—–
(क) कोणत्याही विद्यमान कायद्याद्वारे कोणत्याही राज्याच्या शासनाला किंवा अन्य प्राधिकाऱ्याला प्रदान करण्यात आलेले कोणतेही कार्याधिकार राष्ट्रपतीकडे हस्तांतरित होतात, असे मानले जाणार नाही ; किंवा
(ख) राष्ट्रपती व्यतिरिक्त अन्य प्राधिकाऱ्यास कायद्याद्वारे कार्याधिकार प्रदान करण्यास संसदेला प्रतिबंध होणार नाही.

Leave a Reply