भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ४३ :
कामगारांना निर्वाह वेतन, इत्यादी :
राज्य, अनुरूप विधिविधानाद्वारे किंवा आर्थिक सुसंघटन करून अथवा अन्य कोणत्याही मार्गाने शेतकी, औद्योगिक अथवा अन्य प्रकारच्या सर्व कामगारांना काम, निर्वाह वेतन, समुचित जीवनमान आणि फुरसतीचा आणि सामाजिक व सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग याची शाश्वती देणारी अशी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करील आणि विशेषत: ग्रामीण क्षेत्रांमध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्त्वावर कुटीरोद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील.