भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद ३४७ :
राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयी विशेष तरतूद :
भाषेच्या वापरास मान्यता मिळण्याबाबत मागणी केली गेल्यावर जर, एखाद्या राज्यामधील लोकसंख्येपैकी पर्याप्त लोकांची, तिच्याकडून बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेच्या वापरास त्या राज्याकडून मान्यता मिळावी, अशी इच्छा आहे याबद्दल राष्ट्रपतीची खात्री झाली तर तो विनिर्दिष्ट करील अशा प्रयोजनाकरता त्या राज्यात सर्वत्र किंवा त्याच्या कोणत्याही भागात, अशा भाषेला अधिकृतरीत्या मान्यता मिळावी, असा निदेश तो देऊ शकेल.