भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २९७ :
१.(भारताचा क्षेत्रीय जलधी किंवा सागरमग्न खंडभूमी यांच्या आतील मौल्यवान वस्तू आणि अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्रातील साधनसंपत्ती संघराज्याच्या ठायी निहित होणे :
(१) भारताचा क्षेत्रीय जलधी, त्यांची सागरमग्न खंडभूमी किंवा त्याचे अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्र याच्या आतील सागराखाली असलेल्या सर्व जमिनी, खनिजे व इतर मौल्यवान वस्तू संघराज्याच्या ठायी निहित होतील आणि संघराज्याच्या प्रयोजनांसाठी धारण केल्या जातील.
(२) भारताच्या अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्रातील इतर सर्व साधनसंपत्ती ही देखील संघराज्याच्या ठायी निहित होईल आणि संघराज्याच्या प्रयोजनांसाठी धारण केली जाईल.
(३) भारताचा क्षेत्रीय जलधी, त्याची सागरमग्न खंडभूमी, त्याचे अनन्यसाधारण आर्थिक परिक्षेत्र व इतर सागरी परिक्षेत्रे यांच्या मर्यादा या, संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्याअन्वये वेळोवेळी विनिर्दिष्ट करण्यात येतील त्याप्रमाणे असतील.)
———–
१. संविधान (चाळिसावी सुधारणा) अधिनियम, १९७६ याच्या कलम २ द्वारे मूळ अनुच्छेद २९७ ऐवजी दाखल केला (२७ मे १९७६ रोजी व तेव्हापासून).