Constitution अनुच्छेद २७१ : संघराज्याच्या प्रयोजनांसाठी विवक्षित शुल्के आणि कर यांवर अधिभार :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २७१ :
संघराज्याच्या प्रयोजनांसाठी विवक्षित शुल्के आणि कर यांवर अधिभार :
अनुच्छेद २६९ व २७० मध्ये काहीही असले तरी, संसदेला, कोणत्याही वेळी १.(अनुच्छेद २४६क खालील वस्तू व सेवा कराखेरीज) त्या अनुच्छेदात निर्देशिलेल्यांपैकी कोणतेही शुल्क किंवा कर संघराज्याच्या प्रयोजनांसाठी, अधिभार आकारून वाढवता येईल आणि अशा कोणत्याही अधिभाराचे संपूर्ण उत्पन्न, भारताच्या एकत्रित निधीचा भाग होईल.
——–
१. संविधान (एकशे एकवी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम ११ द्वारा (१६-९-२०१६ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply