Constitution अनुच्छेद २५० : आणीबाणीची उद्घोषणा जारी असताना राज्य सूचीतील कोणत्याही बाबीसंबंधी विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २५० :
आणीबाणीची उद्घोषणा जारी असताना राज्य सूचीतील कोणत्याही बाबीसंबंधी विधिविधान करण्याचा संसदेचा अधिकार :
(१) या प्रकरणात काहीही असले तरी, संसदेला, आणीबाणीची उद्घोषणा जारी असताना, १.(अनुच्छेद २४६क अन्वये तरतूद केलेला वस्तू व सेवा कर किंवा) राज्य सूचीत नमूद केलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबीसंबंधी भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्राकरता किंवा त्याच्या कोणत्याही भागाकरता कायदे करण्याचा अधिकार असेल.
(२) आणीबाणीची उद्घोषणा करण्यात आली नसती तर, जो कायदा करण्यास संसद सक्षम झाली नसती, असा संसदेने केलेला कायदा, उद्घोषणा जारी असण्याचे संपुष्टात आल्यापासून सहा महिन्यांचा कालावधी संपताच, अक्षमतेच्या मर्यादेपुरता निष्प्रभावी होईल, मात्र उक्त कालावधी संपण्यापूर्वी त्या कायद्यान्वये केलेल्या किंवा करण्याचे वर्जिलेल्या गोष्टी याला अपवाद असतील.
——–
१. संविधान (एकशे एकावी सुधारणा) अधिनियम २०१६ याच्या कलम ५ द्वारा (१६-९-२०१६ पासून) समाविष्ट केले.

Leave a Reply