भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३ यत :
विवरणे :
प्रत्येक सहकारी संस्था, राज्य शासनाने पद्निर्देशित केलेल्या प्राधिकाऱ्याकडे प्रत्येक वित्तीय वर्ष संपण्यापूर्वी सहा महिन्याच्या आत, पुढील बाबींसह विवरणे सादर करणे. अर्थात –
क) तिच्या कार्याचा वार्षिक अहवाल ;
ख) तिच्या लेख्यांचे लेखापरीक्षित विवरण पत्र ;
ग) सहकारी संस्थेच्या सर्व सदस्य मंडळाने मान्यता दिलेली शिल्लक रकमेच्या विनियोगासंबंधीची योजना ;
घ) सहकारी संस्थेच्या उपविधीच्या कोणत्याही सुधारणा असल्यास त्याची सूची ;
ङ) तिच्या सर्व सदस्य मंडळाची सभा आयोजित करण्याच्या दिनांकासंबंधीची घोषणा आणि नियत होतील तेव्हा निवडणुका घेणे ; आणि
च) राज्य अधिनियमाच्या कोणत्याही तरतुदीनुसार निबंधकाने मागितलेली इतर कोणतीही माहिती.