भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २४३ यट :
मंडळाच्या सदस्यांची निवडणूक :
१) राज्य विधान मंडळाने केलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी मावळत्या मंडळाच्या सदस्यांचा पदावधी समाप्त झाल्यावर, नव्याने निवडून आलेल्या मंडळाचे सदस्य लगेच पदग्रहण करतील, याची सुनिश्चिती होण्यासाठी संचालक मंडळाचा अवधी संपण्यापूर्वी मंडळाची निवडणूक घेतली जाईल.
२) सहकारी संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधीक्षण, संचालन व नियंत्रण आणि अशा निवडणुकांचे आयोजन, राज्य विधान मंडळ, कायद्याद्वारे तरतूद करतील अशा प्राधिकरणाकडे किंवा निकायाकडे निहित असतील :
परंतु असे की राज्या विधान मंडळ, अशा निवडणुका घेण्याच्या कार्य पद्धतीची व मार्गदर्शक तत्वांची कायद्याद्वारे तरतूद करील.