भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद २१क :
१.(शिक्षणाचा हक्क :
राज्य, सहा ते चौदा वर्षे वयाच्या सर्व बालकांसाठी, राज्यास कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने, मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करील.)
—————————-
१. संविधान (शहाएैंशीवी सुधारणा) अधिनियम, २००२ याच्या कलम २ द्वारे समाविष्ट केला (१ एप्रिल २०१० रोजी व तेव्हापासून).