Constitution अनुच्छेद १८४ : उपसभापती किंवा अन्य व्यक्ती यांचा सभापतिपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १८४ :
उपसभापती किंवा अन्य व्यक्ती यांचा सभापतिपदाची कर्तव्ये पार पाडण्याचा किंवा सभापती म्हणून कार्य करण्याचा अधिकार :
(१) सभापतीचे पद रिक्त असताना, त्या पदाची कर्तव्ये उपसभापतीला, किंवा उपसभापतीचे पदही रिक्त असेल तर, राज्यपाल त्या प्रयोजनाकरता ज्याला नियुक्त करील अशा विधानपरिषदेच्या सदस्याला पार पाडावी लागतील.
(२) विधानपरिषदेच्या कोणत्याही बैठकीत सभापती अनुपस्थित असताना उपसभापती किंवा, तोही अनुपस्थित असल्यास, विधानपरिषदेच्या कार्यपद्धती नियमांद्वारे ठरविण्यात येईल अशी व्यक्ती, किंवा अशी व्यक्ती उपस्थित नसल्यास, विधानपरिषद ठरवील अशी अन्य व्यक्ती, सभापती म्हणून कार्य करील.

Leave a Reply