भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १७७ :
मंत्री व महा अधिवक्ता यांचे सभागृहांबाबत हक्क :
प्रत्येक मंत्र्यास व राज्याच्या महा अधिवक्त्यास, राज्याच्या विधानसभेत, किंवा विधानपरिषद असलेल्या राज्याच्या बाबतीत, दोन्ही सभागृहात भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल आणि विधानमंडळाच्या ज्या समितीत सदस्य म्हणून त्याचे नाव घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत भाषण करण्याचा आणि अन्यथा त्यांच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल, पण या अनुच्छेदाच्या आधारे मतदान करण्यास तो हक्कदार असणार नाही.