Constitution अनुच्छेद १६२ : राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती :

भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १६२ :
राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती :
या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती, ज्यांच्या बाबतीत राज्य विधानमंडळास कायदे करण्याचा अधिकार आहे त्या बाबींपर्यंत असेल :
परंतु असे की, ज्या बाबतीत राज्य विधानमंडळास व संसदेस कायदे करण्याचा अधिकार आहे, अशा कोणत्याही बाबतीत राज्याचा कार्यकारी अधिकार, या संविधानाद्वारे किंवा संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे संघराज्यास किंवा त्याच्या प्राधिकाऱ्यास प्रदान केलेल्या कार्यकारी अधिकारास अधीन असेल व तो त्यामुळे मर्यादित होईल.

Leave a Reply