भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १२६ :
कार्यकारी मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती :
जेव्हा भारताच्या मुख्य न्यायमुर्तीचे पद रिक्त असेल अथवा मुख्य न्यायमूर्ती अनुपस्थितीच्या कारणामुळे किंवा अन्यथा आपल्या पदाच्या कर्तव्याचे पालन करण्यास असमर्थ असेल तेव्हा, त्या पदाची कर्तव्ये, च्या न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांपैकी ज्या एकाची राष्ट्रपती त्या प्रयोजनाकरता नियुक्ती करील, तो न्यायाधीश पार पाडील.