भारताचे संविधान ( राज्यघटना )
अनुच्छेद १२४ ख :
१.(आयोगाची कामे :
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची कर्तव्ये, –
क) भारताचा मुख्य न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे अन्य न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायमूर्ती व उच्च न्यायालयांचे अन्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी शिफारस करणे;
ख) उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींची व अन्य न्यायाधीशांची एका उच्च न्यायालयातून अन्य कोणत्याही उच्च न्यायालयात बदली करण्याची शिफारस करणे; आणि
ग) शिफारस केलेली व्यक्ती, सक्षम व सचोटीची असल्याची सुनिश्चिती करणे,
ही असतील.)
———-
१. संविधान (नव्याण्णावी सुधारणा) अधिनियम २०१४ याच्या कलम ३ द्वारा (१३-४-२०१५ पासून) समाविष्ट करण्यात आले. सुप्रीम कोर्ट अॅडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक १६ ऑक्टोबर २०१५ च्या आदेशाद्वारे ही दुरुस्ती रद्द करण्यात आली आहे.