भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ९५ :
तोंडी कराराचा पुरावा वगळणे :
मालमत्तेच्या अशा कोणत्याही संविदेच्या, देणगीच्या किंवा अन्य संपत्तिव्यवस्थेच्या तरतुदी किंवा दस्तऐवजाच्या रूपात लेखनिविष्ट करणे कायद्याने आवश्यक आहे अशी कोणतीही बाब कलम ९४ नुसार शाबीत झाल्यास, त्या तरतुदींच्या विरूद्ध असणारे. त्यात बदल करणारे, त्यात काही घालणारे किंवा त्यातून काही कमी करणारे असे काहीतरी शाबीत करण्यासाठी अशा कोणत्याही संलेखातील पंक्षांच्या दरम्यामन किंवा त्यांच्या हितसंबंध-प्रतिनिधींच्या दरम्यान, कोणत्याही तोंडी कराराचा किंवा कथनाचा पुरावा स्वीकृत केला जाणार नाही:
परंतु असे की ज्या कोणत्याही तथ्यामुळे कोणताही दस्तऐवज विधिबाह्य होऊ शकेल किंवा कोणत्याही व्यक्तीला त्यासंबंधीचा कोणताही हुकूमनामा किंवा आदेश मिळवण्याचा हक्क प्राप्त होऊ शकेल ते तथ्य शाबीत करता येईल; उदाहरणार्थ-कपट, धाकदपटशा, अवैधता, यथायोग्य निष्पादनाचा अभाव, संविदा करणाऱ्या कोणत्याही पक्षांच्या ठायी क्षमतेचा अभाव, प्रतिफलाचा अभाव किंवा त्याची निष्फळता अथवा तथ्यविषयक किंवा कायदेविषयक चूकभूल :
परंतु आणखी असे की दस्तऐवजात जी बाब अनुल्लेखित आहे व जी त्याच्या तरतुदींशी विसंगत नाही अशा कोणत्याही बाबीसंबंधीच्या कोणत्याही स्वतंत्र तोंडी कराराचे अस्तित्व शाबीत करता येईल. हे परंतुक लागू होते किंवा नाही याचा विचार करताना न्यायालय तशा प्रकारच्या दस्तऐवजाच्या बाबतीत ती उपचाराची बाब कितीशी अपेक्षित आहे ते लक्षात घेईल :
परंतु तसेच आणखी असे की अशा कोणत्याही ंविदेखाली, देणगीखाली किंवा संपत्तिव्यवस्थेखाली लागू होणाऱ्या कोणत्याही आबंधनाची पूर्ववर्ती शर्त असलेल्या कोणत्याही स्वतंत्र तोंडी कराराचे अस्तित्व शाबीत करता येईल :
परंतुक तसेच आणखी असे की अशी कोणतही संविदा, देणगी किंवा संपत्तिव्यवस्था लेखी असणे कायद्याने आवश्यक असले किंवा दस्तऐवजांच्या नोंदणीसंबंधी त्या त्या काळी अमलात असलेल्या कायद्यानुसार त्यांची नोंदणी करण्यात आली असेल ती प्रकारणे खेरीजकरून इतर बाबतींत, अशी संविदा, देणगी किंवा संपत्तिव्यवस्था रद्द करण्यासाठी किंवा तीत बदल करण्यासाठी मागाहून झालेल्या कोणत्याही स्वतंत्र तोंडी कराराचे अस्तित्व शाबीत करता येईल :
परंतु तसेच आणखी असे की कोणत्याही संविदेत स्पष्टपणे नमूद न केलेली आनुषंगिके ज्या कोणत्याही परिपाठानुसार किंवा रूढीनुसार बहुश: त्या प्रकारच्या संविदांशी अनुबद्ध असतात ती शाबीत करता येतील :
परंतु तसेच आणखी असे की अशी आनुषांगिक तरतूद अनुबद्ध करणे हे संविदेच्या स्पष्ट तरतुदींना प्रतिकूल किंवा त्यांच्याशी विसंगत असता कामा नये :
परंतुक तसेच आणखी असे की दस्तऐवजाची भाषा विद्यमान तथ्यांशी कशा रीतीने संबंधित आहे हे दाखविणारे कोणतेही तथ्य शाबीत करता येईल.
उदाहरणे :
(a) क) कलकत्याहून विशाखापट्टनम्ला जाणाऱ्या जहाजांमधील मालाचे विमापत्र काढलेले आहे. माल एका विशिष्ट जहाजावर चढवलेला होता व ते जहाज बेपत्ता झाले. ते विशिष्ट जहाज विमापत्रातून तोंडी कराराने वगळले होते, हे तथ्य शाबीत करता येत नाही.
(b) ख) (ऐ) हा (बी) ला १ मार्च २०२३ रोजी १००० रुपये देण्याचा बिनशर्त लेखी करार करतो. पैसे ३१ मार्चपर्यत देण्यात येऊ नयेत असा त्याचवेळी तोंडी करार झाला होता, हे तथ्य शाबीत करता येत नाही.
(c) ग) रामपूर टी इस्टेट या नावाची संपदा एका विलेखान्वये विकण्यात आली असून विकलेल्या संपदेचा नकाशा ह्या विलेखामध्ये अंतर्भूत आहे. नकाशात अंतर्भूत असलेली जमीन त्या संपदेचा भाग असल्याचे नेहमीच समजले जात होते व विलेखान्वये ती संक्रामित होणे अभिप्रेत होते, हे तथ्य शाबीत करता येत नाही.
(d) घ) (बी) च्या मालकीच्या विवक्षित खाणी विवक्षित अटींवर चालवण्यासाठी (ऐ) हा (बी) शी लेखी संविदा करतो. त्यांच्या मूल्याबाबत (बी) ने केलेल्या अपवेदनामुळे (ऐ) तसे करण्यास प्रवृत्त झाला हे तथ्य शाबीत करता येईल.
(e) ङ) संविदेच्या विनिर्दिष्ट पालनासाठी (ऐ) हा (बी) विरुद्ध दावा लावतो व तिच्या तरतुदींपैकी एक तरतूद त्याने चुकीने घातलेली असल्याने तेवढी दुरुस्ती करावी अशीही विनंती करतो. ज्या चुकीमुळे (ऐ) संविदेत दुरुस्ती करण्यास हक्कदार होऊ शकेल अशी चूक झाली होती असे त्याला शाबीत करता येईल.
(f) च) (ऐ) हा पत्राद्वारे (बी) चा माल मागवतो. पैसे देण्याच्या वेळेसंबंधी त्यात काहीही म्हटलेले नाही व मालाची पाठवणी होताच तो माल स्वीकारतो. (बी) हा (ऐ) विरुद्ध किंमतीसाठी दावा लावतो. माल काही मुदतीच्या उधारीवर पुरवण्यात आला असून ती मुदत अजून संपलेली नाही असे (ऐ) दाखवून देऊ शकेल.
(g) छ) (ऐ) हा (बी) ला घोडा विकतो व तो निकोप असल्याबद्दल तोंडी हमी देतो. (ऐ) कडून ३०००० रुपयाला घोडा विकत घेतला अशा शब्दांत (ऐ) हा (बी) ला कागदपत्र करुन देतो. (बी) ला तोंडी हमी शाबीत करता येईल.
(h) ज) (ऐ) हा (बी) कडून राहण्याची जागा भाड्याने घेतो. व (बी) ला एक कार्ड देतो आणि त्यावर खोल्या, दरमहा १०००० रु असे लिहिलेले आहे. या अटींमध्ये अंशत: भोजनाचा अंतर्भाव होतो असा तोंडी करार झाल्याचे (ऐ) ला शाबीत करता येईल. (ऐ) हा (बी) कडून एका वर्षासाठी राहण्याची जागा भाड्याने घेतो व एका मुखत्याराने तयार केलेला व रीतसर मुद्रांक लावलेला असा एक करारनामा त्यांच्या दरम्यान करण्यात येता. भोजनाविषयी त्यात काही उल्लेख नाही. अटींमध्ये भोजनाच्या अटींचा तोंडी अंतर्भाव केलेला होता हे (ऐ) ला शाबीत करता येणार नाही.
(i) झ) (बी) कडे पैशाची पावती पाठवून (ऐ) आपणांस येणे असलेल्या ऋृणाची मागणी करतो. (बी) पावती ठेवून घेतो, पण पैसे पाठवत नाही. त्या रकमेसाठी केलेल्या दाव्यात (ऐ) ला ही वस्तुस्थिती शाबीत करता येईल.
(j) ञ) (ऐ) व (बी) विवक्षित संभावी घटना घडून आल्यावर परिणामक व्हावयाची अशी विवक्षित लेखी संविदा करतात; तो लेख (बी) कडे ठेवलेला असून तो त्यावरुन (ऐ) विरुद्ध दावा लावतो. कोणत्या परिस्थितीत तो लेख दिला होता ते (ऐ) दाखवून देऊ शकेल.
