Bsa कलम ८३ : कायद्याचे संग्रह आणि निर्णय या संदर्भात गृहीतक :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ८३ :
कायद्याचे संग्रह आणि निर्णय या संदर्भात गृहीतक :
जे पुस्तक कोणत्याही देशाच्या शासनाच्या प्राधिकारान्वे मुद्रित किंवा प्रकाशित झाले असून त्यात त्या देशाच्या कायद्यापैकी कोणत्याही कायद्यांचा अंतर्भाव असल्याचे दिसते अशा प्रत्येक पुस्तकाचा व अशा देशाच्या न्यायालयांच्या निर्णयांची प्रतिवृत्ते ज्यात अंतर्भूत असल्याचे दिसते अशा प्रत्येक पुस्तकाचा खरेपणा न्यायालय गृहीत धरील.

Leave a Reply