Bsa कलम ४९ : उत्तरादाखल असेल ते वगळता वाईट पूर्वचारित्र्य संबद्ध (सुसंगत) नसते :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ४९ :
उत्तरादाखल असेल ते वगळता वाईट पूर्वचारित्र्य संबद्ध (सुसंगत) नसते :
फौजदारी कामांमध्ये, आरोपी व्यक्तीचे चारित्र्य वाईट आहे हे तथ्य असंबद्ध (विसंगत) असते, मात्र तिचे चारित्र्य चांगले आहे असा पुरावा देण्यात आलेला असेल तर त्या बाबतीत वाईट चारित्र्याचा मुद्दा संबद्ध (सुसंगत) होतो.
स्पष्टीकरण १ :
ज्या कामांमध्ये कोणत्याही व्यक्तीचे वाईट चारित्र्य हेच वादतथ्य असेल त्यांना हे कलम लागू नाही.
स्पष्टीकरण २ :
पूर्व दोषसिद्धी ही वाईट चारित्र्याचा पुरावा म्हणून संबद्ध (सुसंगत) आहे.

Leave a Reply