Bsa कलम १५८ : साक्षीदाराच्या विश्वासपात्रतेबद्दल संशय व्यक्त करणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १५८ :
साक्षीदाराच्या विश्वासपात्रतेबद्दल संशय व्यक्त करणे :
साक्षीदाराच्या विश्वासपात्रतेबाबत, साक्षीदाराला बोलावणाऱ्या पक्षकाराला न्यायालयाच्या संबतीने अथवा विरूद्ध पक्षकाराला, पुढील प्रकारे संशय व्यक्त करता येईल :
(a) क) साक्षीदाराबद्दल स्वत:ला असलेल्या माहितीवरून तो विश्वासाला अपात्र आहे असा आपला समज आहे अशी साक्ष देणाऱ्या व्यक्तीच्या साक्षीवरून;
(b) ख) स्वत:ची साक्ष देण्याबद्दल साक्षीदाराला लाच देण्यात आलेली आहे किंवा लाच देऊ केल्याचा प्रस्ताव त्याने स्वीकारला आहे किंवा त्यासाठी अन्य कोणतेही भ्रष्टकारी प्रलोभन त्याला दाखवण्यात आले आहे हे शाबीत करून;
(c) ग) त्याच्या साक्षीचा जो कोणताही भाग विरोधला जाण्यास पात्र असेल त्याच्याशी विसंगत अशी पूर्वीची कथने शाबीत करून;
स्पष्टीकरण :
जो साक्षदार दुसरा एखादा साक्षीदार विश्वासाला अपात्र असल्याचे सांगतो त्याने आपल्या सरतपासणीच्या वेळी आपल्या या समजामगील कारणे दिली पाहिजेत असे नाही. पण त्याला उलटतपासणीत त्याची कारणे विचारली जाऊ शकतील व तो जी उत्तरे येईल ती जर खोटी असली तर त्यामुळे नंतर त्याच्यावर खोटा पुरावा दिल्याचा दोषारोप ठेवता येत असला तरी त्याने दिलेली उत्तररे विरोधात येणार नाहीत.
उदाहरणे :
(a) क) जो माल (बी) ला विकून त्याच्याकडे पोचवण्यात आला त्याच्या किंमतीसाठी (ऐ) हा (बी) विरुद्ध दावा लावतो. आपण (बी) कडे माल पोचवला असे (सी) म्हणतो. आपण (बी) कडे माल पोचवला नव्हता असे तो पूर्वी एका प्रसंगी म्हणाला होता हे दाखवून देण्यासाठी पुरावा पुढे करण्यात येतो. पुरावा स्वीकार्य आहे.
(b) ख) (बी) चा खून केल्याबद्दल (ऐ) वर अभ्यारोप ठेवण्यात आला आहे. (ऐ) ने आपणास केलेल्या जखमेमुळे मरण ओढवले असे (बी) ने मृत्युसमयी कथन केले असे (सी) म्हणतो. पूर्वीच्या प्रसंगी (सी) ने सांगितले की, (बी) मरताना (ऐ) ने (बी) ला ज्या जखमेतून त्याचा मृत्यु झाला होता असे घोषित केले नाही हे दाखवून देण्यासाठी पुरावा पुढे करण्यात येतो. पुरावा स्वीकार्य आहे.

Leave a Reply