भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १४ :
व्यवहार क्रमाचे अस्तित्व केव्हा संबद्ध असते:
एखादी विशिष्ट कृती केली गेली होती किंवा काय असा जेव्हा प्रश्न असेल तेव्हा, ज्यानुसार ती कृती स्वाभाविकपणे केली गेली असती असा कोणताही व्यवहारक्रम अस्तित्वात असणे हे संबद्ध तथ्य आहे.
उदाहरणे :
(a) क) विशिष्ट पत्र पाठवलेले होते किंवा काय असा प्रश्न आहे. विवक्षित जागी ठेवलेली सर्व पत्रे डाकेत न्यायची हा सामान्य व्यवहारक्रम होता व विशिष्ट पत्र त्या जागी ठेवले गेले होते ही तथ्ये संबद्ध आहेत.
(b) ख) विशिष्ट पत्र (ऐ) ला पोचले हाते किंवा काय असा प्रश्न आहे. रीतसर क्रमानुसार ते डाकेत टाकले होते व अनामपत्र कार्यलयामार्फत ते परत करण्यात आले नव्हते, ही तथ्ये संबद्ध आहेत.
