भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ९० :
इलेक्ट्रॉनिक संदेशाबाबत गृहीतक :
एखादा इलेक्ट्रॉनिक संदेश पाठवणाऱ्याने तो ज्या व्यक्तीला पाठवला असल्याचे दिसत असेल तिच्याकडे इलेक्ट्रॉनिक मेल सव्र्हरने पाठवलेला असा संदेश आणि ज्याने तो पाठवला त्याच्या संगणकाला पाठवण्यासाठी संदेश, हे एकरुप आहेत असे न्यायालयाला गृहीत धरता येईल, मात्र असा संदेश कोणी पाठवला याबाबत न्यायालय काहीही गृहीत धरणार नाही.