Bsa कलम ६४ : दस्तऐवज हजर करण्याबाबतच्या नोटिशीचे नियम:

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ६४ :
दस्तऐवज हजर करण्याबाबतच्या नोटिशीचे नियम:
कलम ६० च्या खंड (a)(क) मध्ये निर्दिष्ट केलेल्या दस्तऐवजांच्या मजकुराचा दुय्यम पुरावा देऊन पाहणाऱ्या पक्षकाराने ज्या पक्षकाराच्या कब्जात किंवा नियंत्रणाखाली तो दस्तऐवज असेल त्याला अथवा त्याच्या अधिवक्त्याला किंवा प्रतिनिधिला तो दस्तऐवज हजर करण्यासाठी कायद्याने विहित केलेली अशी नोटीस आणि कायद्याने कोणतीही नोटीस विहित केली नसेल, तर प्रकरणाच्या परिस्थितीनुसार न्यायालयास वाजवी वाटेल अशी नोटीस दिल्याशिवाय, असा दुय्यम पुरावा देता येणार नाही :
परंतु, दुय्यम पुरावा ग्राह्य होण्यासाठी अशी नोटीस पुढीलपैकी कोणत्याही प्रसंगी किंवा नोटिशीला फाटा देणे न्यायालयाला योग्य वाटेल अशा अन्य कोणत्याही प्रसंगी आवश्यक असणार नाही –
(a) क) शाबीत करावयाचा दस्तऐवज म्हणजेच नोटीस असेल तेव्हा;
(b) ख) प्रकरणाच्या स्वरूपामुळे आपणाला तो दस्तऐवज हजर करावा लागेल हे विरूद्ध पक्षाला माहीत असणे आवश्यक असेल तेव्हा;
(c) ग) विरूद्ध पक्षाने कपटाने किंवा जबरदस्तीने मूळ लेखाचा कब्जा मिळवलेला आहे असे दिसून येईल किंवा शाबीत केले जाईल तेव्हा;
(d) घ) न्यायालयात विरूद्ध पक्षाजवळ किंवा त्याच्या अभिकत्र्याजवळ मूळलेख असेल तेव्हा;
(e) ङ) दस्तऐवज गहाळ झाल्याचे विरूद्ध पक्षाने किंवा त्यांच्या अभिकत्र्याने कबूल केले असेल तेव्हा;
(f) च) जिच्याकडे दस्तऐवजाचा कब्जा असेल ती व्यक्ती त्या आदेशिकेच्या कक्षेबाहेर असेल किंवा त्या आदेशिकेच्या अधीन नसेल तेव्हा.

Leave a Reply