भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ५३ :
कबूल केलेली तथ्ये शाबीत करण्याची आवश्यकता नाही:
कोणत्याही कार्यवाहीतील पक्षकारांनी किंवा त्यांच्या अभिकत्र्यांनी सुनावणीच्या वेळी जे तथ्य कबूल करण्यास रूकार दिला असेल किंवा जे कबूल करण्यास सुनावणीपूर्वी त्यांनी कोणत्याही स्वहस्ताक्षरित लेखाद्वारे रूकार दिला असेल किंवा वादकथनाबाबत त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही नियमानुसार त्यांनी आपल्या वादकथनांद्वारे जे कबूल केले असल्याचे मानण्यात आले असेल असे कोणतेही तथ्य शाबीत करण्याची आवश्यकता नाही;
परंतु, कबूल तथ्ये अशा कबुलीच्या द्वारे नव्हे, तर अन्य प्रकारे शाबीत करणे हे न्यायालय स्वविवेकानुसार आवश्यक करू शकेल.