Bsa कलम ५० : नुकसानीवर ज्यामुळे परिणाम होतो असे चारित्र्य :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ५० :
नुकसानीवर ज्यामुळे परिणाम होतो असे चारित्र्य :
दिवाणी कामांमध्ये, कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्य असे आहे की, त्यामुळे जी नुकसानी मिळावयास हवी ती रक्कम कमी जास्त होऊ शकते हे तथ्य संबद्ध आहे.
स्पष्टीकरण :
४६, ४७, ४९ व ५० या कलमांमध्ये, चारित्र्य या शब्दात व्यक्तीचा लैकिक व मनोवृत्ती या दोन्हींचा समावेश आहे; पण ५९ व्या कलमात जे उपबंधित केले आहे तेवढे खरेजीकरून एरव्ही, केवळ सर्वसाधारण लौकिकाचा व सर्वसाधारण मनोवृत्तीचाच पुरावा देता येईल, ज्या विशिष्ट कृतींद्वारे तो लौकिक किंवा ती मनोवृत्ती दर्शवली होती त्यांचा पुरावा देता येणार नाही.

Leave a Reply