Bsa कलम ३० : भू नकाशे – तक्ते – आराखडे यांची संबद्धता :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ३० :
भू नकाशे – तक्ते – आराखडे यांची संबद्धता :
सर्वसाधारणपणे सार्वजनिक विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या प्रकाशित भूनकाशात किंवा तक्त्यात अथवा केंद्र शासनाच्या किंवा कोणत्याही राज्य शासनाच्या प्राधिकारान्वये तयार करणत्यात आलेल्या भूनकाशात किंवा आराखाड्यात प्राय: दाखवल्या जाणाऱ्या किंवा नमूद केल्या जाणाऱ्या किंवा नमूद केल्या बाबींसंबंधी अशा भूनकाशात, तक्त्यात किंवा आराखड्यात जेव्हा वादतथ्यांची किंवा संबद्ध तथ्यांची कथने केलेली असतात तेव्हा ती कथनेच स्वयमेव संबद्ध तथ्ये असतात.

Leave a Reply