Bsa कलम १६७ : नोटिशीवरून जो दस्तऐवज हजर करण्यास नकार देण्यात आला तो पुरावा म्हणून वापरणे :

भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १६७ :
नोटिशीवरून जो दस्तऐवज हजर करण्यास नकार देण्यात आला तो पुरावा म्हणून वापरणे :
जो दस्तऐवज हजर करण्याबद्दल एखाद्या पक्षकाराला नोटीस मिळालेली असेल तो हजर करण्यास तो नकार देतो तेव्हा, नंतर तो दुसऱ्या पक्षकाराच्या संमतीशिवाय किंवा न्यायालयाच्या आदेशाशिवाय तो दस्तऐवज पुरावा म्हणून वापरू शकत नाही.
उदाहरण :
(ऐ) एका करारपत्रावरुन (बी) विरुद्ध दावा लावतो आणि ते हजर करण्यासाठी (बी) ला नोटीस देतो. संपरीक्षेच्या वेळी (ऐ) दस्तऐवजाची मागणी करतो आणि तो हजर करण्यास (बी) नकार देतो. (ऐ) त्यातील मजकुराचा दुय्यम पुरावा देतो. (ऐ) ने दिलेल्या दुय्यम पुराव्याला विरोधण्यासाठक्ष किंवा करारपत्रावर मुद्रांक नाही हे दाखविण्यासाठी (बी) तो दस्तऐवज हजर करु पाहतो. तो तसे करु शकणशर नाही.

Leave a Reply