भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १४८ :
पूर्वीच्या लेखी कथनांसंबंधी उलटतपासणी :
एखाद्या साक्षीदाराने पूर्वी जी कथने लेखी रूपात केलेली असतील किंवा त्यांची पूर्वीची जी कथने लेखनिविष्ट करण्यात आली असतील व प्रस्तुत बाबींशी संबद्ध असतील त्यांबाबत, असा लेख त्याला दाखविल्याशिवाय किंवा शाबीत करण्यात आल्याशिवाय त्याची उलटतपासणी करता येईल; पण जर त्या लेखाद्वारे त्याचे कथनांमधील विरोध दाखवून देणे हा त्यामागील उद्देश असेल तर, लेख शाबीत होऊ शकण्यापूर्वी त्याच्या कथनातील विरोध दाखवून देण्यासाठी त्या लेखातील जे भाग वापरावयाचे असतील त्यांच्याकडे त्याचे लक्ष वेधले पाहिजे.