भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
प्रकरण १० :
साक्षीदारांच्या साक्ष तपासणीविषयी :
कलम १४० :
साक्षीदार हजर करणे व त्याची साक्ष तपासणी करण्याबाबतचा क्रम:
कोणत्या क्रमाने साक्षीदार पुढे केले जातील व त्यांची साक्षतपासणी केली जाईल त्याबाबत अनुक्रमे दिवाणी व फौजदारी प्रक्रियेसंबंधीच्या त्या त्या काळाच्या कायद्याद्वारे व प्रथेनुसार विनियमन होईल आणि अशा कोणत्याही कायद्याच्या अभावी न्यायालयाच्या स्वविवेकानुसार विनियमन होईल.