भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १२३ :
हुंडी घेणारा, माल घेणारा आणि परवाना मिळालेली व्यक्ती यांना प्रतिबंध :
कोणत्याही विनियमपत्राच्या विकर्षकाला ते काढण्याचा किंवा पृष्ठांकिंत करण्याचा प्राधिकार होता हे अशा विपत्राचा स्वीकत्र्याला नाकबूल करू दिले जाणार नाही, तसेच उपनिधानाच्या किंवा अनुज्ञप्तीच्या प्रारंभकाळी असे उपनिधान करण्याचा किंवा अशी अनुज्ञप्ती देण्याचा आपल्या उपधिात्याला किंवा अनुज्ञापकाला प्राधिकार होता हे कोणत्याही उपनिहितीला किंवा अनुज्ञप्तिधारकाला नाकबूल करून दिले जाणार नाही.
स्पष्टीकरण १ :
एखादे विनिमयपत्र ज्या व्यक्तीने काढले असल्याचे दिसते तिनेच ते खरोखरी काढलेले होते हे त्या विपच्यिा स्वीकत्र्याला नाकबूल करता येईल.
स्पष्टीकरण २ :
जर उपनिहितीने उपनिहित माल उपनिधात्याहून अन्य व्यक्तीकडे सुपूर्द केला तर, त्यावर उपनिधात्याचा हक्क नसून उपनिधात्याविरूद्ध अशा व्यक्तीचा त्यावर हक्क होता असे उपनिहितीला शाबीत करता येईल.