भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ११७ :
एखाद्या विवाहित स्त्रीला आत्महत्या करण्यास चिथावणी देण्यासंदर्भात गुहीतक :
जेव्हा एखाद्या विवाहित स्त्रीने केलेल्या आत्महत्येला तिच्या पतीने किंवा तिच्या पतीच्या कोणत्यांही नातेवाइकाने अपप्रेरणा दिली होती काय असा प्रश्न उद्भवला असेल आणि तिने आपल्या विवाहाच्या तारखेपासून सात वर्षाच्या कालावधीत आत्महत्या केली आहे व तिचा पती किंवा तिच्या पतीचा असा नातेवाईक याने तिला क्रूर वागणूक दिली होती हे दाखवून देण्यात येईल तेव्हा, त्या प्रकरणाची इतर सर्व परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाला असे गृहीत धरता येईल की, अशा आत्महत्येस तिच्या पतीने किंवा तिच्या पतीच्या अशा नातेवाइकाने अपप्रेरणा दिली होती.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, क्रूर वागणूक देणे याला भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ८६ यामध्ये दिल्याप्रमाणे तोच अर्थ असेल.