भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम ११३ :
मालकीसंबंधी शाबितीची जबाबदारी :
जी वस्तु कोणत्याही व्यक्तीच्या कब्जात आहे असे दाखवून देण्यात आलेले आहे त्या वस्तुची ती मालक आहे किंवा काय असा प्रश्न असतो तेव्हा, ती व्यक्ती मालक नाही हे शाबीत करण्याची जबाबदारी ती मालक नाही असे म्हणणाऱ्या व्यक्तीवर असते.