भारतीय साक्ष्य (पुरावा) अधिनियम २०२३
कलम १०० :
दस्तऐवजाचा भाग अंशत: एकाला लागू हाते तर अंशत: दुसऱ्याला लागू होतो, पण संपूर्ण कोणालाच लागू होत नाही अशा वेळी पुरावा देणे:
जेव्हा वापरलेली भाषा अंशत: विद्यामान तथ्यांच्या एका समुहाला व अंशत: विद्यमान तथ्यांच्या दुऱ्या समुहाला लागू होते, पण ती भाषा त्यांपैकी एकालाही नेमकेपणाने लागू होत नाही तेव्हा, ती दोहांपैकीं कशाला लागू करण्याचे अभिप्रेत होते ते दाखवून देण्यासाठी पुरावा देता येईल.
उदाहरण :
(वाय) च्या ताब्यात असलेली (एक्स) येथील आपली जमीन (ऐ) हा (बी) ला विकण्याचा करार करतो. (ऐ) ची (एक्स) येथे जमीन आहे, पण ती (वाय) च्या ताब्यात नाही, आणि एक जमीन (वाय) च्या ताब्यात आहे, पण ती (एक्स) येथे नाही. कोणती जमीन विकण्याचे त्याला अभिप्रेत होते हे दाखवून देणाऱ्या तथ्यांचा पुरावा देता येईल.