Bp act कलम ४१ : मनोरंजनाची स्थाने-जाहीर सभा यातील अव्यवस्था वगैरेबद्दल पोलिसांनी बंदाबस्त करणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ४१ :
मनोरंजनाची स्थाने-जाहीर सभा यातील अव्यवस्था वगैरेबद्दल पोलिसांनी बंदाबस्त करणे :
१) मनोरंजनाच्या कोणत्याही सार्वजनिक जागी किंवा जेथे येण्यास लोकांस आमंत्रण किंवा मोकळीक असेल अशा कोणत्याही जमावात किंवा सभेत अव्यवस्था किंवा कायद्याचा भंग न होऊ देण्याकरिता, किंवा जमलेल्या लोकांवर येणारा उघड व प्रत्यक्ष धोका टाळण्याकरिता त्या मनोरंजनाच्या जागी किंवा त्या जमावात किंवा सभेत पोलीस शिपायाहून सर्वात श्रेष्ठ दर्जाचा जो कोणताही वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर असेल त्यास वैधरीत्या करण्यात आले असतील अशा नियमांस व आदेशांस अधीन राहून त्या मनोरंजनाच्या जागी किंवा जमावात किंवा सभेत लोकांस येऊ देण्यासंबंधी आणि तेथे चालवावयाचे काम शांतपणे व कायदेशीर रीतीने चालविण्यात यावे यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी त्यास आवश्यक वाटतील ते वाजवी निदेश देता येतील, आणि अशा प्रत्येक वाजवी निदेशाला अनुसरुन वागणे सर्व व्यक्तींना बंधनकारक असेल. पोलिसांना तेथे मुक्त प्रवेश असणे.
२) पोट-कलम (१) च्या उपबंधाची आणि त्याअन्वये केलेल्या कोणत्याही निदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनोरंजनाच्या, जमावाच्या किंवा सभेच्या अशा प्रत्येक जागी येण्याजाण्याची पोलिसास पूर्ण मोकळीक असेल.

Leave a Reply