Bp act कलम ३४ : सक्षम अधिकारी रस्त्यावर अडथळे उभारण्याचा प्राधिकार देऊ शकेल :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ३४ :
सक्षम अधिकारी रस्त्यावर अडथळे उभारण्याचा प्राधिकार देऊ शकेल :
आयुक्त व १.(अधीक्षक) यास आपापल्या प्रभाराखाली असलेल्या क्षेत्रात, जेव्हा त्याच्या मते तशी उपाययोजना करणे आवश्यक असेल तेव्हा, त्यास योग्य वाटेल अशा पोलीस अधिकाऱ्यास कोणत्याही रस्त्यावर वाहने हाकण्याचे तात्पुरते बंद करण्याच्या प्रयोजनाकरिता अशा रस्त्यावर अडथळे उभारण्याचा अधिकार देता येईल आणि त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही विधीतील उपबंधांचे अशा कोणत्याही वाहनासंबंधात किंवा वाहनाच्या चालकाकडून किंवा ते ताब्यात असलेल्या व्यक्तीकडून उल्लंघन करण्यात आले नाही याबद्दल आपली खात्री करुन घेता येईल. तसेच उक्त प्राधिकाऱ्यास अशा अडथळ्याचा उपयोग करण्यासंबंधी विनियमन करण्याकरिता त्यास योग्य वाटतील असे आदेश देता येतील.
——–
१. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनिय क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये जिल्हा अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply