Bp act कलम ३२: १.(सन २.(१८९८ चा अधिनियम क्रमांक ५ याचे कलम १४४) अन्वये राज्य शासनाला आदेश देता येईल:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ३२:
१.(सन २.(१८९८ चा अधिनियम क्रमांक ५ याचे कलम १४४) अन्वये राज्य शासनाला आदेश देता येईल:
राज्य शासनाला, ज्या ज्या वेळी आवश्यक वाटेल त्या त्या वेळी, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे २.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८, कलम १४४) अन्वये दंडाधिकाऱ्याने जर कोणताही अधि-आदेश दिला तर उक्त संहिते अन्वये राज्य शासनाला अमलात असण्याचे चालू ठेवता येईल अशा कोणत्याही आदेशासारखा आदेश देता येईल.)
——–
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम १६ अन्वये मूळ कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. आता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) पहा.

Leave a Reply