महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २७ :
शिक्षेसंबंधीच्या आदेशाविरुद्ध अपिले :
कलम २५ अन्वये किंवा त्यानुसार केलेले नियम किंवा दिलेले आदेश याअन्वये पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत दिलेल्या कोणत्याही आदेशाविरुद्ध राज्य शासनाकडे किंवा राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे विनिर्दिष्ट करील अशा अधिकाऱ्याकडे अपील करता येईल.
१.(परंतु अशा वाढ केलेल्या किंवा, यथास्थिती, देण्यात आलेल्या अधिक कडक शिक्षेविरुद्ध कारणे दाखवा नोटीस दिल्याशिवाय. आणि त्यात दाखविलेले कोणतेही कारण विचारात घेतल्याशिवाय. अपिलातील शिक्षा वाढवली जाणार नाही किंवा शिक्षा अधिक कडक केली जाणार नाही.)
——–
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ८ अन्वये परंतुक समाविष्ट करण्यात आले.