Bp act कलम २२ जे-१ : १.(जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२ जे-१ :
१.(जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :
१) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ म्हणून संबोधण्यात येणारे एक मंडळ घटीत करील.
२) जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल :-
अ) जिल्हा पोलीस अधीक्षक – अध्यक्ष;
ब) वरिष्ठतम अपर पोलीस अधीक्षक – सदस्य;
क) पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) – सदस्य-सचिव;
परंतु, उपरोक्त सदस्यांपैकी एकही सदस्य मागासवर्गातील नसेल तर, जिल्हा पोलीस अधीक्षक, अशा प्रवर्गातील, पोलीस उप अधीक्षक दर्जाच्या एका अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करील.
स्पष्टीकरण :
या पोट-कलमाच्या प्रयोजनार्थ, मागासवर्ग या शब्दप्रयोगाचा अर्थ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास-वर्ग असा आहे.)
——-
१. सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम ४ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply