Bp act कलम १८: १.(अधीक्षकाकडून) प्रतिवृत्त मागविण्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्याचे अधिकार:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १८:
१.(अधीक्षकाकडून) प्रतिवृत्त मागविण्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्याचे अधिकार:
जिल्हा दंडाधिकाऱ्यास, १.(अधीक्षकाकडून) अपराध, सराईत गुन्हेगार, अव्यवस्था न होऊ देणे, जमाव व मनोरंजनाचे खेळ यांचे नियमन, पोलीस दल वाटून देणे, २.(अधीक्षकाच्या) हाताखालील कोणत्याही पोलीस दलावरील आपले नियंत्रण ठेवण्यास आणि सुव्यवस्था राखण्यास सहाय्यभूत होणाऱ्या इतर सर्व गोष्टी याविषयी विशेष किंवा सर्वसाधारण प्रतिवृते मागविता येतील.
——–
१. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याचे कलम २, अनुसूची अन्वये जिल्हा अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
२. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ कलम २ अन्वये महानिरीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट केले हा मजकूर १३ डिसेंबर १९८२ पासून दाखल करण्यात आले असल्याचचे मानण्यात येईल.

Leave a Reply