Bp act कलम १७: जिल्ह्यातील पोलीस दलावर जिल्हा दंडाधिकाऱ्याचे नियंत्रण:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १७:
जिल्ह्यातील पोलीस दलावर जिल्हा दंडाधिकाऱ्याचे नियंत्रण:
१) कोणत्याही जिल्हयाचा १.(अधीक्षक) व जिल्ह्याचे पोलीस दलही जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असतील.
२) असे नियंत्रण ठेवताना जिल्हा दंडाधिाकाऱ्यास राज्य शासन या बाबतीत करील असे नियम व आदेश लागू असतील २.(व तो महसूल आयुक्ताच्या कायदेशीर आदेशास अधीन असेल).
———
१. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याचे कलम २, अनुसूची अन्वये जिल्हा अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
२. सन १९५८ चा मुंबई अधिनियम क्रमांक ८ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये समाविष्ट केले.

Leave a Reply