Bp act कलम १६: आयुक्त आणि १.(अधीक्षक) यांचे सर्वसाधारण अधिकार :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १६:
आयुक्त आणि १.(अधीक्षक) यांचे सर्वसाधारण अधिकार :
आयुक्त, २.(महासंचालक आणि महानिरीक्षक) यांच्या आदेशास अधीन राहून, आणि १.(अधीक्षक) हा, २.(महासंचालक, व महानिरीक्षक) आणि जिल्हा दंडाधिकारी याच्या आदेशास अधीन राहून आपापल्या प्राधिकारक्षेत्रात, शस्त्रे, कवायती, व्यायाम, व्यक्तीचे आणि घटनांचे निरीक्षण, परस्परसंबंध, कर्तव्यांचे वाटप, कायदा, सुव्यवस्था अणि पद्धती यांचा अभ्यास यासंबंधीच्या सर्व बाबी आणि त्याच्या नियंत्रणाखालील पोलीस दलाचे कार्यकारी तपशील किंवा त्यांनी त्यांची कर्तव्ये पार पाडणे या संबंधीच्या सर्व बाबी यांच्या संबंधात सर्व निदेश देईल व त्या विनियमित करील.
——–
१. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याचे कलम २, अनुसूची अन्वये जिल्हा अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
२. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ कलम २ अन्वये महानिरीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट केले हा मजकूर १३ डिसेंबर १९८२ पासून दाखल करण्यात आले असल्याचचे मानण्यात येईल.

Leave a Reply